Sign In New user? Start here.
sai loose her weight for her new filmसईने दोन चित्रपटातील वेगवेळ्या भूमिकांसाठी तिने वजन वाढवले आणि तब्बल ७ किलो वजन कमी केले
 
 
zagmag

“दोन चित्रपटांसाठी सईने वजन वाढवून पुन्हा कमी केले..."

आजकल चित्रपटाला साजेसे लूक प्रमाणे वजन वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा जास्त ट्रेंड नसेल ही. पण कॅरेक्टरच्या मागणी नुसार अभिनेता, अभिनेत्री आपल्या लूक मध्ये, वजनामध्ये चेंजेंस करतात. काही वर्षापूर्वी जेव्हा नटरंग चित्रपटामध्ये अतुल कुलकर्णीने आपल्या कॅरेक्टरसाठी वजन वाढवलेही होते आणि कमी ही केले होते. आता याच रेस मध्ये सई ताम्हणकर ही सामील झाली आहे. पण सईने दोन चित्रपटातील वेगवेळ्या भूमिकांसाठी तिने वजन वाढवले आणि तब्बल ७ किलो वजन कमी केले.

सईने गुरु पौर्णिमा या चित्रपटासाठी वजन वाढवाले होते आणि तिच्या अगामी चित्रपट प्यारवाली लव स्टोरीसाठी वजन पुन्हा वाढवलेले वजन कमी केले आहे.दिग्दर्शक गिरीश मोहिते यांच्याशी चर्चा केल्यानंतर गुरुपौर्णिमामध्ये व्यक्तिरेखेला साजेसा लूक असावा यासाठी सई ने वजन वाढवले होते. त्यावेळी वजन वाढवण्यासाठी सई ने खाण्याचा सपाटा लावला होता. गुरुपौर्णिमाचे चित्रीकरण संपल्यानंतर लगेच संजय जाधव यांच्या प्यारवाली लव स्टोरीचे चित्रीकरण सुरु होणार होते. या भूमिकेत तीला सडपातळ लूक हवा होता. त्यासाठी दोन महिने वाढवलेले वजन घटवण्यासाठी जिममध्ये वर्कआउट कराव लागल. याच दरम्यान क्लासमेटमधल्या अँक्शन सीन्स साठी सईने किक बॉक्सिंग शिकून घेतली.

 

------------------