Sign In New user? Start here.
"सैराट आला आणि कोपर्डीसारखी घटनाही घडली. सैराटला सुळी द्या आणी मलाही"
 
 
zagmag

सैराट आला आणि कोपर्डीसारखी घटनाही घडली. सैराटला सुळी द्या आणी मलाही

sairat controversial

सैराटपूर्वी जग सुंदर होतं सगळं छान सुरू होतं. सैराट आला आणि बलात्कार सुरू झाले कोपर्डीसारखी घटनाही घडली. सैराटला सुळी द्या आणी मलाही असं वक्तव्य सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केल. ते पुण्यात एका पारितोषीक वितरण समारंभात बोलत होते.

काही दिवसांपूर्वी भाजप आमदार मनिषा चौधरी यांनी ‘सैराट’सारख्या चित्रपटामुळे मुलं बिघडत आहेत, बलात्काराच्या घटना वाढत आहेत, असं अजब विधान विधानसभेत कोपर्डी बलात्कार प्रकरणाची चर्चा असताना मांडलं होतं. शिवाय, ‘सैराट’सारख्या सिनेमांवर बंदी घालावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. कोपर्डीतील आरोपींना कडक शिक्षेची तजवीज करण्याऐवजी मनिषा चौधरींनी अजब विधान केलं होतं.

पुण्यात नारी समता मंच तर्फे छाया तमायचेकर या जाती निर्मुलनाचे काम करणाऱ्या आणि खतना या कुप्रथे विरोधात काम करणाऱ्या गटास ‘कन्या महाराष्ट्राची’ पारितोषिक नागराज मंजुळे यांच्या हस्ते देण्यात आले. तिथे नागराज यांनी ही खंत बोलून दाखवली.

------------------------------------------.