Sign In New user? Start here.
Sairat Moments with Rinku and Akash "प्रमोशन मधून आर्ची आणि परश्याने काढला स्वत:साठी वेळ
 
 
zagmag

प्रमोशन मधून आर्ची आणि परश्याने काढला स्वत:साठी वेळ

Sairat Moments with Rinku and Akash

झी स्टुडिओजच्या आगामी 'सैराट' या चित्रपटाची सध्या सर्वत्रच जोरदार चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला ज्यामुळे ही उत्सुकता अजुनच वाढलीये. यापूर्वी गाण्यांमधुन 'झिंगाट' नृत्य करणा-या आणि 'सैराट झालं जी' म्हणत प्रेमाची नवी परिभाषा सांगणा-या यातील नायक नायिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलंय.

Sairat Moments with Rinku and Akash

सध्या या चित्रपटाची टीम प्रसिद्धीच्या निमित्ताने विविध शहरांमध्ये फिरत आहे. मुंबईमध्ये प्रसिद्धीच्या या कामात व्यस्त असताना या चित्रपटातील जोडीने या प्रमोशनमधुन थोडासा वेळ काढुन समुद्र दर्शनही घेतले सोबतच बुलेट राईडचाही आनंद घेतला..

Sairat Moments with Rinku and Akash

दादर चौपाटीजवळ एका वाहिनीच्या मुलाखतीदरम्यान आर्ची आणि परश्याने म्हणजेच रिंकु राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी मुंबईच्या या समुद्र दर्शनाचा आनंद लुटला आणि त्यांचे हे क्षण आपल्या कॅमे-यात कैद केले प्रसिद्ध छायाचित्रकार प्रसाद नाईक यांनी..

Sairat Moments with Rinku and Akash
------------------------------------------.