Sign In New user? Start here.
"सैराटचा परशा महेश मांजरेकरांच्या चित्रपटात’
 
 
zagmag

"सैराटचा परशा महेश मांजरेकरांच्या चित्रपटात"

sairat parsha acted in manjerekar film

सैराट चित्रपटातील परशा सध्या काय करतोय असा प्रश्न तुम्हा सगळ्यानाच पडला असेल? तर अभिनेता आकाश ठोसर सध्या तो महेश मांजरेकरांच्या चित्रपटात करत आहे. सध्या या चित्रपटाच शुटींगही सुरू झालं आहे. अलीकडेच मुंबईत आकाश आपल्या नव्या सिनेमाचे शूटिंग करताना दिसला. त्याची शूटिंग सेटवरील काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

महेश मांजरेकर दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपटाचे नाव ‘एफयु’ (फ्रेण्डस अनलिमिटेड) असे असून कॉलेज आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. परश्याच्या भूमिके नंतर आकाशला कोणत्या प्रकारची भूमिका करायला मिळते याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये नक्कीच असेल. आकाशचा या चित्रपटातील लूक लक्ष वेधून घेत आहे. आकाशसोबत या सिनेमात आणखी कोणकोणते कलाकार झळकणार, हेसुद्धा गुलदस्त्यातच आहे. कळत नकळत या कुस्तीपटूची मराठी चित्रपट सृष्टीत एन्ट्री झाली आहे. त्याची पुढची घौडदोन पाहण्याची सर्वांना उत्सुकता आहे.

------------------------------------------.