Sign In New user? Start here.
"सलमान आणि आकाश एकत्र
 
 
zagmag

सलमान आणि आकाश एकत्र

salamn and akash

टायटल वाचून आश्चर्य वाटल ना! पण सैराट ची हवाच एवढी झाली आहे की बॉलीवूड्ला पण सैराटच्या रंगात रंगून गेलं आहे. म्हणूनच की काय चक्क सलमान आणि आकाश एकत्र असलेला फोटॊ आकाश ने सोशल नेटवर्किंग वर शेअर केला आहे.

ही भेट कोणत्या कारणासाठी घेतली गेली हे समजले नाही. आकाश ठोसरला मराठी चित्रपट सृष्टीतील नवा चॉकलेट हिरो म्हणून संबोधल जात आहे. त्याच्या ' फॅन्स' च्या संख्ये मध्ये मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 'सैराट' चित्रपटाची बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कौतुक केले . अभिनेता सलमाननेसुद्धा या सिनेमाचे आणि कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले. सलमानला भेटल्या नंतर आकशच्या चेह-यावरचा आनंद स्पष्ट दिसत आहे. आता लवकरच तो महेश मांजरेकरांच्या आगामी सिनेमातही झळकणार आहे.

------------------------------------------.