Sign In New user? Start here.
sangto aka mrathi movie trailer now on hang out appमराठी सिनेमा सध्या डिजीटल मिडीयामध्ये ऍक्टीव होतोय. बहुचर्चित ‘सांगतो ऐका’ हा सिनेमाही राजश्री मराठीच्या नेतृत्वाखाली 30 सप्टेंबरला दुपारी ३ वाजता गुगल हॅंगआऊट वर भेटीस येतोय.
 
 
zagmag

“मार्केटींग फंडा, “सांगतो ऐका” गुगल हॅंग्आऊटद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला"

मराठी सिनेमा सध्या डिजीटल मिडीयामध्ये ऍक्टीव होतोय. बहुचर्चित ‘सांगतो ऐका’ हा सिनेमाही राजश्री मराठीच्या नेतृत्वाखाली 30 सप्टेंबरला दुपारी ३ वाजता गुगल हॅंगआऊट वर भेटीस येतोय. सुपरस्टार सचिन पिळगावकर, या सिनेमाचे दिग्दर्शक सतिश राजवाडे, आणि या सिनेमातले इतर सहकलाकारही या हॅंगआऊटमध्ये सहभागी होतील.

विधी कासलीवाल निर्मित आणि लॅन्डमार्क फिल्मसची प्रस्तुती असलेला हया चित्रपटात सचिन पिळगावकर सोबत भाऊ कदम ,वैभव मांगले ,जगन्नाथ निवगुने ,मिलिंद शिंदे ,पूजा सावंत माधव अभ्यंकर ,विजय चव्हाण यांच्याही भूमिका आहेत .सिनेमा येत्या २ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

फेसबुक, गुगल प्लस आणि ट्विटर प्रमाणेच गुगल हॅगआऊटही वेगाने लोकप्रिय होतय. एका छोट्या कॉन्टेस्टद्वारे फॅन्स आणि फॉलोअरसना “सांगतो ऐका”च्या ट्रेलरवर आधारीत प्रश्न विचारण्यात येतील.आणि त्यातल्या पाच भाग्यवान विजेत्यांना या हॅगआऊटमध्ये सहभागी होऊन आपल्या आवडत्या कलाकारांशी गप्पा मारता येतील.

या हॅंगआऊटचा प्रोमो पहा ; http://youtu.be/NJVSTbg_B6o

 

------------------