Sign In New user? Start here.
sat new film of atul kulkarni'सात'ची संहिता निखील महाजन यांनी लिहिलेली असून आशिष बेंडे त्याचे दिग्दर्शन करणार आहे. प्रतापराव गुजर यांची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी साकारणार आहेत.
 
 
zagmag

अतुल कुलकर्णी साकारणार प्रतापराव गुजर!

६ फेब्रुवरी २०१५ रोजी प्रदर्शित होत असलेल्या बहुचर्चित ‘बाजी’ या श्रेयस तळपदे अभिनीत चित्रपटाच्या यशस्वी निर्मितीनंतर दार मोशन पिक्चर्स,आय.एम.ई. मोशन पिक्चर्स आणि ब्लू ड्रॉप फिल्म्स या निर्मीती संस्थांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन त्यांच्या आगामी ‘सात’ या चित्रपटाची घोषणा नुकतीच केली. अरुण रंगचारी, विवेक रंगचारी, सुहृद गोडबोले आणि निखील महाजन या चित्रपटाचे निर्माते आहेत. 'सात'ची संहिता निखील महाजन यांनी लिहिलेली असून आशिष बेंडे त्याचे दिग्दर्शन करणार आहे. प्रतापराव गुजर यांची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी साकारणार आहेत.

निर्मात्यांच्या वतीने दार मोशन पिक्चर्स चे विवेक रंगचारी याप्रसंगी म्हणाले,”बाजी चित्रपटाची प्रारंभिक बोलणी चालू असतानाच मराठी भाषेत भव्य युद्धपटाचीनिर्मिती करण्यासाठी आम्ही ठाम होतो. अर्थातच शिवाजी महाराजांच्या काळात असे असंख्य विषय आणि प्रसंग दडलेले आहेत. आपल्याकडे या आधी शिवाजी महाराजांवर आधारित उत्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे, तरीही आम्ही अशा विषयाच्या शोधत होतो जो भव्य दिव्य पद्धतीने मोठ्या पडद्यावर मांडता येईल. आजवर मराठीत कधीही न झालेल्या भव्य चित्रपटाची निर्मिती करण्याचा आमचा उद्देश होता. ‘सात’ ची संहिता या अपेक्षा सर्व बाबती पूर्ण करत असल्यामुळेच या सिनेमाला हिरवा कंदील दाखवण्यात काहीच अडचण नसल्याने आम्ही या सिनेमाची निर्मिती करत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘सात’ हा भव्य ऐतिहासिक युद्धपट शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सत्यघटना आणि प्रसंगानवर आधारित आहे. याचबरोबर शिवाजी महाराजांचा सेनापती प्रतापराव गुजर आणि त्याचे सहा मर्द मराठे जे महाराजांसाठी आणि स्वाभिमानसाठी प्राण पणाला लावून लढले त्याची अत्यंत प्रेरणादायी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न ‘सात’ मध्ये आपल्याला पहायला मिळणार आहे.

आपल्या भूमिकेविषयी अतुल कुलकर्णी म्हणाले: “ही भूमिका मी कशी करू शकेन असे आव्हान देणाऱ्या भूमिकाच मला करायला जास्त आवडतात. उदाहरणार्थ ‘नटरंग'. आणि अर्थातच हे मला मान्य करायला हव की प्रतापरावची भूमिका आणि ‘सात’ ची संहिता हे आजवरच सर्वात मोठ आव्हान माझ्यासाठी असेल.

गेली २ वर्ष आशिष बेंडे या कथेवर काम करतोय. अत्यंत नावाजलेल्या ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘शाळा’, ‘मसाला’, ‘पुणे 52’, ‘एलिझबेथ एकादशी’ आणि आता ‘बाजी’ या चित्रपटांच्या प्रमुख सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी त्याने पेललेली आहे.

 

------------------