Sign In New user? Start here.
Satish Rajwade playing a Bhaigiri role for Marathi दिग्दर्शक सतीश राजवाडे अभिनयातही आपली चुणूक दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आगामी 'टाईम बरा वाईट' या सिनेमात सतीश राजवाडे एका आगळ्या वेगळ्या हटके भूमिकेत दिसणार आहेत. स
 
 
zagmag

दिग्दर्शक सतीश राजवाडें आता करणार भाईगिरी

दिग्दर्शक सतीश राजवाडे अभिनयातही आपली चुणूक दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आगामी 'टाईम बरा वाईट' या सिनेमात सतीश राजवाडे एका आगळ्या वेगळ्या हटके भूमिकेत दिसणार आहेत. सतीश राजवाडे यांची ही भूमिका त्यांनी आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या चित्रपटात सतीश राजवाडे चक्क भाईगिरी करताना दिसणार आहे. या भूमिकेविषयी बोलताना सतीश राजवाडे म्हणाले की, मला स्वतःला ही भूमिका करायला मजा आली. ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा विश्वास ही सतीश राजवाडे यांनी व्यक्त केला.

आयुष्यात 'वेळ' कधीच, कुणासाठी थांबत नाही, आजच्या धावपळीच्या जगण्यात वेळेचं महत्त्व आपण जाणतोच. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी ही वेळ केव्हा चांगली असते तर केव्हा वाईट, याच कथाबीजावर बेतलेला 'टाईम बरा - वाईट' हा नवा थ्रिलर अॅक्शनपट येतोय. अनेक गाजलेल्या चित्रपटांचे प्रसिद्ध संकलक राहुल भातणकर 'टाईम बरा - वाईट' चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करताहेत.

नेहमीच्या परिघाबाहेर वेगळा कथाविषय प्रेक्षकांना 'टाईम बरा - वाईट' सिनेमात पहाता येणार असून मराठीतील अनेक मातब्बर कलाकार यात एकत्र आले आहेत. यात सतीश राजवाडे, आनंद इंगळे, ऋषिकेश जोशी, भूषण प्रधान, निधी ओझा, सिद्धार्थ बोडके, सुनील पेंडुरकर, नुपूर दुधवडकर, राजेश भोसले, प्रणव रावराणे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. 'वी. आर. जी. मोशन पिक्चर्स प्रा. लि.' निर्मितीसंस्थेचे विजय गुट्टे यांनी 'टाईम बरा वाईट' चित्रपटाची निर्मिती केली असून सह निर्माता बाहुल आहेत. येत्या ५ जूनला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 

 

------------------