Sign In New user? Start here.
shashank ketakr and tjashree pradhan divorceकारण काही महिन्यापूर्वी या दोघांनी पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी दावा दाखल केला होता. आता यांची केस समुपदेशनासाठी ठेवली जाण्याचे वृत्त आहे.
 
 
zagmag

समुपदेशनाने श्री आणि जान्हवी मधला दूरावा कमी होणार?

"हॊणार सून मी या घरची" या मालिकेत श्री आणि जान्हवी मधला दूरावा कमी झाला आहे. पण ख-या आयुष्यात शंशाक आणि तेजश्री प्रधान मधला दूरावा कमी होणार की नाही हे लवकरच कळेल. कारण काही महिन्यापूर्वी या दोघांनी पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी दावा दाखल केला होता. आता यांची केस समुपदेशनासाठी ठेवली जाण्याचे वृत्त आहे. या दोघांच्या केसवर अलीकडेच सुनावणी झाली आहे आणि यांची केस समुपदेशककाकडे पाठवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. जेणेकरून दोघांमधील गैरसमज दूर करून दोघांमधला दूरावा कमी केल्या जाण्याचा प्रयत्न केला जाईल.

फेब्रुवारी २०१४ मधे या दोघांच लग्न झालं आणि १८ एप्रिल २०१५ रोजी शंशाक ने घटस्फोटासाठी अर्ज न्यायालयात सादर केला. एका वर्षातच दूर गेलेल्या जोडीमधला मनमुटाव कमी होण्यासाठी समुपदेशनाची भूमिका किती महत्वपूर्ण ठरते हे काळच ठरवेल.

 

------------------