Sign In New user? Start here.
shashank ketkar and tejashri likely to file divorceहोणार सून मी ह्या घरची" या मालिकेतील श्री आणि जान्हवीची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पंसतीस उतरली. ख-या आयुष्यात जेव्हाही जोडी एकत्रआली तेव्हा प्रेक्षकांनाही तेवढाच आनंद झाला. पण आता ही जोडी घटस्फोटा पर्यंत येऊन पोहचली आहे
 
 
zagmag

मालिकेप्रमाणे ख-या आयुष्यात श्री जान्हवीचा घटस्फोट?

"होणार सून मी ह्या घरची" या मालिकेतील श्री आणि जान्हवीची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पंसतीस उतरली. ख-या आयुष्यात जेव्हाही जोडी एकत्रआली तेव्हा प्रेक्षकांनाही तेवढाच आनंद झाला. पण आता ही जोडी घटस्फोटा पर्यंत येऊन पोहचली आहे.

तुम्ही म्हणत असाल की मालिकेत ही सध्या घटोस्फोटाच ट्रक सुरू आहे. पण ख-या आयुष्यातही शंशाक आणि तेजश्री मधले वाद विकोपाला गेले आहेत. ८ फेब्रुवारी २०१४ला पुण्यात शशांक आणि तेजश्रीचा विवाह झाला होता.

शशांकने पुण्यातील फॅमिली कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याची माहिती मिळतेय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये व्यावसायिक तसंच व्यक्तिगत आयुष्यात खटके उडत आहेत.शशांक सध्या 'गोष्ट तशी गमतीची' हे व्यावसायिक नाटक करत आहे, तर तेजश्री प्रधान 'कार्टी काळजात घुसली' नाटकाव्दारे रंगभूमीवर पदार्पण केलं आहे.

 

------------------