Sign In New user? Start here.
shashank ketkar now become a singer झी मराठीवरील 'होणार सून मी या घरची" या लोकप्रिय मालिकेतून अवघ्या महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांच्या मनात आपली खास प्रतिमा उमटविणारा आपल्या सर्वांचा लाडका श्री अर्थात शशांक केतकर गायक बनला आहे.
 
 
zagmag

शंशाक केतकर बनला गायक

झी मराठीवरील 'होणार सून मी या घरची" या लोकप्रिय मालिकेतून अवघ्या महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांच्या मनात आपली खास प्रतिमा उमटविणारा आपल्या सर्वांचा लाडका श्री अर्थात शशांक केतकर गायक बनला आहे. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण ही कोणती ही अफवा नसून "सागरिका म्युझिक" च्या "यारा…" या नवीन रोमॅंटिक ड्यूएट गाण्यासाठी शशांक केतकर आणि गायिका दीपिका जोग यांनी पार्श्वगायन केले असून ह्या गाण्याचा व्हिडीओ सुद्धा त्याच्यावरच चित्रित करण्यात आला आहे.

मराठी तसेच बंगाली म्युझिक क्षेत्रात आघाडीचे नाव असलेल्या सागरिका म्युझिकने आजवर अनेक नवोदित गायकांना उत्तम संधी देऊन त्यांचे करिअर घडविण्यात मोलाची साथ दिली आहे. सतत काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असलेल्या सागरिका म्युझिकच्या सागरिका बाम या नेहमीच नवीन टॅलेंटच्या शोधात असतात. दीपिका ही केवळ टॅलेंटड नसून ती व्हर्सटाईल आहे. तिचं "यारा…" हे सॉफ्ट रोमॅंटिक गाणं मी रिलीज करण्याचे तसेच त्याचा उत्तम व्हिडीओ तयार करण्याचे मी ठरविले. शशांक हा खरंच खूप गुणी अभिनेता आहे. आपल्या संतुलित अभिनयातून शशांकने अपेक्षेपेक्षा अधिकच चांगले काम केले असल्याचे सागरिका बाम यांनी आवर्जून सांगितले.

मुळात मी अभिनेता आहे त्यामुळे कॅमेरा फेस करणे हे माझ्यासाठी कठीण नसून माईक फेस करणे खरंतर थोडे अवघड होते. माझी आणि दीपिकाची ओळख तशी फार जुनी आहे. विलेपार्ल्यातील तिच्या घरी अनेक वेळा जॅमिंग सेशन्स मध्ये मी आवर्जून जायचो. गाणे गुणगुणायचो भविष्यात आपणही एखाद्या गाण्यासाठी पार्श्वगायन करू अशी कल्पना माझ्या डोक्यात होती आणि ती दीपिका, जसराज, हृषिकेश आणि सौरभ यांच्या उत्तम सहकार्यामुळे आज पूर्ण झाली. सागरिका बाम यांनी याआधीही तयार केलेले व्हिडिओ मी पाहिलेले असून त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव उत्तम होता. मला खात्री आहे की रसिक प्रेक्षकांना हे गाणे नक्की आवडेल अशी आशा अभिनेता शशांक केतकर यांनी व्यक्त केली.

मला खूप मस्त वाटते आहे. सागरिका मॅडम यांच्या सोबत काम करताना खूप काही शिकायला मिळाले. ह्या गाण्याचा व्हिडीओ करताना सुरुवातीला थोडे दडपण होते पण शशांकने कॅमेरा संदर्भात दिलेल्या टिप्स खूप उपयोगी ठरल्या असे गायिका दीपिका जोग हिने सांगितले. "यारा… " या सुमधुर गाण्याचे शब्द गीतकार वैभव जोशी यांनी लिहिले असून संगीत जसराज जोशी, सौरभ भालेवर आणि हृषिकेश दातार या त्रिकुटाने दिले आहे. "तेव्हाची कविता कोरी" या गाण्यासाठी देखील या तीन संगीतकारांनी सागरिका सोबत आधी काम केलेले आहे. या गाण्याचा व्हिडिओ प्रेक्षकांना सागरिका म्युझिकच्या युट्युब चॅनेल पाहता येणार आहे.

 

------------------