Sign In New user? Start here.
shri devi in paithani fashion showसचिन पिळगावकर या सदाबहार सुपरस्टार आपण गोड चेह-याचा कलाकार म्हणूनच गेली पाच दशके ऒळखतो. त्यांच्य चेह-यावर कधी कुणी दाढीची खुंदे पाहिली आहेत? नाही ना! अगदी त्यांच्या पत्नी सुप्रिया पिळगावकरांनीही आतापर्यंत पाहिली नव्हती.
 
 
zagmag

“श्रीदेवी सोबत मराठी कलाकार रंगले पैठणी फॅशन शो मध्ये....."

पैठणी म्हणताच भरजरी कोणाच्याही नजरेत भरेल अशी साडी. आजकल पैठणीने आपल रूप बदललं आहे. त्यातही काही नाविन्यता आणली जात आहे. पैठणी फक्त साडी पुरती मर्यादीत न राहाता आता ती विविध स्वरूपाच्या ड्रेसेस मध्ये ही झळकू लागली आहे. याचा प्रत्यय काही दिवसापूर्वी नाशिक मधील येवला या गावातील लोंकानी घेतला. राज्य शासनाचा पर्यटन विभाग पर्यटन विकास महामंडळातर्फे साकारलेल्या येवला ग्रामीण पर्यटन माहिती पैठणी प्रोत्साहन केंद्राच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी प्रसिद्ध सिनेतारका श्रीदेवी यांच्या हस्ते दिमाखात पार पडला.

shri devi in paithani fashion show

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पैठणी फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. फॅशन शोमध्ये स्वत: श्रीदेवी यांनी साडे तीन लाख रुपये किमतीची प्युअर ब्राँकेट या प्रकारातील साडेपाच फूट उंचीची नक्षीदार फुलांची मोती रंगाची पैठणी परिधान करून रॅम्पवर अवतरल्या तेव्हा प्रेक्षकांच्या नजरा त्यांचावरच खिळून होत्या.

shri devi in paithani fashion show

श्रीदेवी सोबत फॅशन शोमध्ये झी मराठीच्या कलाकारांनी ही सहभाग घेतला. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतील प्राजक्ता माळी आणी आणि ललित, 'जावई विकत घेणे आहे' या मालिकेतील तन्वी पालव आणि निरंजन कुलकर्णी, 'अस्मिता' या मालिकेतील मयुरी ह्या कलाकारांनी या शोमध्ये सहभाग घेतला. बॅक स्टेज या कलाकारांना थोडासा वेळ मिळताच पैठणी परिधान केलेल्या या तारे तारकांना आपले छायाचित्र काढण्याचा मोह आवरता आला नाही...

 

------------------