Sign In New user? Start here.
South-Indian actress Nidhi to act in a Marathi film मराठी चित्रपटक्षेत्रात येणाऱ्या या कलावंतांमध्ये आत्ता आणखी एक नाव नोंदवले जाणार आहे. साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री निधी ओझा हिची आत्ता मराठीत एन्ट्री होत असून 'टाईम बरा वाईट' या चित्रपटात तिच्या अभिनयाची झलक रसिकांना पाहायला मिळणार आहे.
 
 
zagmag

दक्षिणात्य निधीची मराठीत धम्माल

मराठी चित्रपटसृष्टीतल्या आमुलाग्र बदलांनी इतर भाषिक प्रेक्षकानांही आपल्याकडे आकर्षित केले आहे. अभिनय आणि कलागुणांना नेहमीच अग्रगण्य स्थान देणाऱ्या मराठी चित्रसृष्टीत अमराठी कलाकारांचा सातत्याने वावर आढळतो. मराठी चित्रपटक्षेत्रात येणाऱ्या या कलावंतांमध्ये आत्ता आणखी एक नाव नोंदवले जाणार आहे. साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री निधी ओझा हिची आत्ता मराठीत एन्ट्री होत असून 'टाईम बरा वाईट' या चित्रपटात तिच्या अभिनयाची झलक रसिकांना पाहायला मिळणार आहे.

घड्याळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या आपल्या सगळ्यांनाच कधी चांगल्या तर कधी वाईट वेळेशी सामना करावा लागला आहे. धावपळीच्या दुनियेत वेळेचे महत्त्व कुणालाच टाळता येत नाही. हाच धागा पकडत 'टाईम बरा वाईट' हा नवा अॅक्शनपट येत आहेत. अनेक गाजलेल्या चित्रपटांचे प्रसिध्द संकलक राहुल भातणकर यांनी या चित्रपटाद्वारा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे.

नेहमीच्या परिघाबाहेरील वेगळा कथाविषय 'टाईम बरा वाईट' सिनेमात प्रेक्षकांना पहाता येणार असून मराठीतील अनेक मातब्बर कलाकार यात एकत्र आले आहेत. 'वी. आर. जी. मोशन पिक्चर्स' निर्मितीसंस्थेचे विजय गुट्टे प्रस्तुत आणि बाहुल चौधरी, अनुराग श्रीवास्तव सहनिर्मित या चित्रपटात आनंद इंगळे, ऋषिकेश जोशी, भूषण प्रधान, सतीश राजवाडे, निधी ओझा, सिद्धार्थ बोडके, सुनील पेंडुरकर, नुपूर दुधवडकर, राजेश भोसले, प्रणव रावराणे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. १९ जूनपासून 'टाईम बरा वाईट' सर्वांच्या मनोरंजनास सज्ज आहे.

 

------------------