Sign In New user? Start here.
spruha joshis diff lookआजकल स्पृहाजोशी तुम्हाला बदलल्या सारखी वाटतीये का? होना! तिचा लूक खूप वेगळा झालाय किंवा ती स्वत:च्या लूकला घेऊन नविन नविन प्रयोग करत असते.
 
 
zagmag

स्पृहाजोशीचा हटके लूक

spruha joshis diff look

आजकल स्पृहाजोशी तुम्हाला बदलल्या सारखी वाटतीये का? होना! तिचा लूक खूप वेगळा झालाय किंवा ती स्वत:च्या लूकला घेऊन नविन नविन प्रयोग करत असते. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत ती जराशी जाड आणि अगदी साधी दिसत होती. पण पेईंग घोस्ट या चित्रपटादरम्यान तिचा लूक पूर्णपणे बदलला आहे. तिने केलेलं वेटलॉस आणि त्याचबरोबर वेर्स्टन आउटफिट मधे केलेलं फोटो शूट त्यामुळे तिचा लूक पूर्णपणे वेगळा झाला आहे. आणि अर्थातच तो खूप चांगला आहे.

तिच्या या बदललेल्या लूकमुळे सोशल नेटवर्किंग साईटवर तिचे फॉलअर्स पण वाढत आहे. अगदी काही दिवसांपूर्वी तिचा निळ्या टॉप मधला फोटो शूट किंवा, यलो वनपीस मधल्या फोटॊला हजारोनी लाईक्स मिळाले. पण एवढं करून स्पृहा थांबली नाहीये. तिने स्वत: सोबत नविन नविन प्रयोग करण चालू ठेवलं आहे. अगदी आजच तिने फोटोग्राफर तेजस नरूळेकर यांनी क्लिक केलेला वेगळ्या लूक मधाला फोटोला हजारोने लाईक्स मिळाले. यामधे ती कॉलेजला जाणा-या टीनेजर सारखी दिसत आहे.

स्पृहाचा अभिनय आणि तिच्या कविताचे अनेक चाहते आहेतच पण तिच्या सुंदर दिसण्यामुळे या चाहत्यांमधे आणखीभर पडताना दिसतं आहे. स्पृहाने डबल सीट या चित्रपटासाठी लिहलेलं गाणं "किती सांगायच मला" सध्या टीव्ही वर धूमाकूळ घातलय. त्यामुळे सुंदर आणि कवितांच्या साह्याने चाहत्यांच्या मनात घर करणारी स्पृहा पुढे आणखी कोणते नविन प्रयोग करतीये हे लवकरच कळॆल.

 

------------------