Sign In New user? Start here.
mukta archi actress war "सैराट मधील रिंकू राजगुरूने शिक्षणपूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे
 
 
zagmag

सैराट मधील रिंकू राजगुरूने शिक्षणपूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे - मुक्ता बर्वे

mukta archi actress war

चित्रपट हिट झाला की एकदम ऑफर येऊ लागतात. सैराटमधल्या आर्चीचे कदाचित असेच होईल. मात्र तिने आपले शिक्षण पण पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, असे मत मुक्ताने व्यक्त केले.याचबरोबर सैराट या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत, मात्र सैराट सुरु असेल तेव्हा नाटक आणताना खूप काम करावे लागणार आहे असे मुक्ता म्हणाली.चिंचवड गावातील गांधीपेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेत ‘नाटक, चित्रपट ते निर्माती प्रवास’ या विषयावर सिने अभिनेत्री मुक्ता बर्वे हिची मुलाखत सुधीर गाडगीळ यांनी घेतली. नाटक, चित्रपट ते निर्माती या आपल्या प्रवासाविषयी सांगताना मुक्ता म्हणाली की, अवघी चार वर्षांची असताना आईच्याच ‘रूसू नका फूगू नका’ या नाटकात काम केले. त्यानंतर वयाच्या १५ व्या वर्षी नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने रत्नाकर मतकरींच्या ‘घर तिघांचं’ या नाटकात भूमिका केली. शिक्षण घेऊन प्रोफेशन करणे गरजेचे असल्याचे ध्यायान येऊन तीन वर्ष नाट्यशास्त्राचे धडे घेतले. फुल येणारं झाड असेल तर त्याला खतपाणी घातल्यावर डौल येतो, याचा अनुभव आला. लहान वयात सतीश आळेकर, जब्बार पटेल, विजय मेहता अशी मोठी माणसे भेटली.

विनय आपटे यांचे ‘डॅडी आय लव्ह यू’, भक्ति बर्वे यांचे ती ‘फुलराणी’, प्रशांत दामलेंची नाटके आपण पाहिली. सुरेखा पुणेकर, शकुंतला नगरकरांच्या लावण्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. सूर्य पाहिलेला माणूस, रणांगण विविध नाटकांमधला डॉ. श्रीराम लागू, गिरीष ओक, मीनाताई कुलकर्णी यांचा अभिनय पाहिला. अभिनेत्याला सर्वांगाने काम करावे लागते हे जाणवले. हम तो तेरे आशिक है, फायनल ड्राफ्ट, कबड्डी कबड्डी या नाटकांमध्ये काम केले. टीव्हीवरील ‘घडलय बिघडलय’ या मालिकेने आपल्याला वेगळी ओळख दिली. त्यानंतर पिंपळपान, आभाळमाया, या मालिकांमध्ये काम केले. जोगवा, मुंबई - पुणे - मुंबई, डबलसीट या चित्रपटांनी नाव दिले, असे मुक्ता बर्वे हिने सांगितले.

------------------------------------------.