Sign In New user? Start here.
Sunny Leone is going to venture in a Marathi film which will be directed by Sujay dahake सुजय सध्या फक्त यांच चित्रपटावर काम करत नसून तो "व्हल्गर अॅक्टिव्हिटीज‌् इनकॉर्प" या चित्रपटाची तयारी सुध्दा करत आहे. महत्वाची गोष्ट अशी की या चित्रपटासाठी चक्क सनी लिओनीच्या नावाच विचार सुजय करत आहे..
 
 
zagmag

सुजय डहाके या मराठी दिग्दर्शकाच्या हिंदी चित्रपटा सनी लिऒनी काम करणार??

काही दिवसांपूर्वी सुजय डहाके यांच्या "फुंतरू" चित्रपटाच पोस्टर सोशल नेटवर्किंग साईट वर अपलोड करण्यात आलं. यामध्ये केतकीच्या वेगळ्या लूकमुळे चित्रपटाची चर्चा जोरात सुरू आहे. पण सुजय सध्या फक्त यांच चित्रपटावर काम करत नसून तो "व्हल्गर अॅक्टिव्हिटीज‌् इनकॉर्प" या चित्रपटाची तयारी सुध्दा करत आहे. महत्वाची गोष्ट अशी की या चित्रपटासाठी चक्क सनी लिओनीच्या नावाच विचार सुजय करत आहे. या चित्रपटात सनीला घेण्यासाठी सुजय डॅनियल म्हणजे सनीच्या पतीशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे.

अलीकडेच डॅनियलकडून सकारात्मक संकेत मिळाले आहे . त्यामुळे ही पोर्न स्टार सुजयच्या मराठी चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे.

शाळा, आजोबा यासारख्या वेगळ्या धाटणीचे चित्रपट केल्यावर सुजय कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढत आहेत. किबंहुना आता फुंतरूच्या पोस्टर वरून लोंकाना काहीतरी वेगळ पाहण्यास मिळेल अशी अशा आहे. सुजयला ‘व्हल्गर अॅक्टिव्हिटीज..’ हा सिनेमा सनीशिवाय करण्याची इच्छा नाही. त्यामुळे सनीकडून होकार मिळाण्यावरच चित्रपटाच भवितव्य अवलंबून आहे.

 

 

------------------