Sign In New user? Start here.

सुरभीचा म्हाळसा ते शुभांगी पर्यंतचा प्रवास- बर्थडे स्पेशल

surabhi hande birthday specialखंडेरायाच्या जीवनावरील "जय मल्हार" मालिकेव्दारा घराघरात पोहचलेली म्हाळसा म्हणजेच सुरभी हांडे आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. केदार शिंदे दिग्दर्शित "अगं बाई अरेच्चा भाग २" या चित्रपटाव्दारे सुरभीचे मराठी चित्रपटसृष्टित पदार्पण होत आहे.सोनाली कुलकर्णीच्या कॉलेज जीवनातील भूमिका सुरभीने साकारली अहे.
 
 
zagmag

सुरभीचा म्हाळसा ते शुभांगी पर्यंतचा प्रवास- बर्थडे स्पेशल

खंडेरायाच्या जीवनावरील "जय मल्हार" मालिकेव्दारा घराघरात पोहचलेली म्हाळसा म्हणजेच सुरभी हांडे आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. केदार शिंदे दिग्दर्शित "अगं बाई अरेच्चा भाग २" या चित्रपटाव्दारे सुरभीचे मराठी चित्रपटसृष्टित पदार्पण होत आहे. सोनाली कुलकर्णीच्या कॉलेज जीवनातील भूमिका सुरभीने साकारली अहे. सुरभी मुळची नगपूरची. जळगावला तिचे बारावीपर्यंत शिक्षण झाले व पुढील शिक्षण तिने नागपूरला घेतले. या संपूर्ण शैक्षणिक कालावधीत शिक्षणाबरोबरच ती विविध नाटकांमध्ये काम करून अभिन्याचेही धडे गिरवत होती. मुळातच नाटकांची आणि अभिनयाची आवड असलेली सुरभीने अनेक एकांकिका स्पर्धामध्ये भाग घेतला. तेथे तिच्या अभिनयाला नेहमीच वाखणण्यात आले. नागपूरला व्यवसायिक नाटकांमध्येही काम केले. नाटकांच्या प्रयोगानिमित्त भारतभर फिरली.

सुरभी अकरावीत असताना तिने स्टॅंडबाय हा हिंदी चित्रपट केला.मोठ्या पडद्याचा तिचा हा पहिला अनुभव होता. पदवीचा अभ्यास करत असताना "आंबट गोड" मालिकेसाठी तिची निवड झाली. त्यासाठी तिने मुंबईची वाट धरली. त्याच दरम्यान म्हणजेच साधारण २-३ वर्षापूर्वी कोठारी ब्रदर्सची तिने ऑडिशन दिली होती. त्यानंतर "जय मल्हार" मालिकेती म्हाळसा च्या भूमिकेसाठी तिला अचानक बोलावणे आले. पंरतु हा प्रवास नव्यानेच सुरू असताना कोणतीही ऑडिशन न घेता केदार शिंदे यांच्यासारख्या मॊठ्या दिग्दर्शकाने आपल्याला चित्रपटात घ्यावे याचे सुरभीला विशेष कौतुक आहे.

ती म्हणाली, "अगं बाई अरेच्चा" भाग २ हा चित्रपट अगदी वेगळ्या धाटणीतील आहे. यात प्रेम कथा असली तरी टिपीकल नाही. स्पर्शाविना प्रेमातील गोडवा हळूवारपणे पटवून देणारी ही कथा आहे. यात कॉलेजातील शुभांगी आणि तिचे प्रेम मी साकारले आहे. म्हाळसा आणि शुभांगी या दोन्ही अत्यंत प्रेमळ असल्या तरी दोघींमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे अर्थातच दोन्ही भूमिका साकारणे यातही खूप फरक आहे. पौराणिक मालिकेतील म्हाळसादेवी साकारताना अनेक मर्यादा आहेत. तेच शुभांगी ही आपल्यासारखीच एक सर्वसाधारण मुलगी आहे. सध्या मालिका करत आसल्याने त्याचा नाही म्हटले तरी थोडासा प्रभाव कायम असल्याने माझ्यात मध्येच म्हाळसा डोकावायची. परंतु मग शिंदे सर लगेच म्हाळसा नाही शुभांगी आहे याची जाणिव करून घ्यायचे.

.

 

------------------