Sign In New user? Start here.
suruchi adkar diwali celebrationया वर्षीची दिवाळी माझ्यासाठी खास : सुरूची अडकर
 
 
zagmag

या वर्षीची दिवाळी माझ्यासाठी खास : सुरूची अडकर

शब्दांकन- गायत्री तेली

suruchi adkar diwali celebration

दिवाळी म्हंटल की उत्साह, नातेवाईक आप्तेष्टांना भेटण्याचा सण. त्याचबरोबर फराळ कंदील पणत्या अशा अनेक गोष्टींन जो छोटा आनंद मिळतो तो काही औरच असतो नाही का? सुरची अडकरच ही असंच काहीस आहे. सुरूची म्हणजेच झी मराठी वरील " का रे दुरावा " या मालिकेतील आदिती खानुलकर. ऒळखल का? आजकल प्रत्येक मराठी घरात हमखास पाहिली जाणारी मालिका आणि प्रत्येकाला कुठे ना कुठे वाटतं असतं ही की आपली सुन, मुलगी, प्रेयसी आदिती सारखीच असावी.

सुरूची मुळची ठाण्याची ती म्हणते दिवाळी सणं म्हंटल की आमच्या घरात खूप उत्साह असतो. घर सजवंण, नविन पणत्यां आणि कंदिल लावण या गोष्टी एन्जॉय करायला मला खूप आवडत. आणि तसही त्या दिवशी शुंटीगला सुट्टी असते त्यामुळे घरच्यांनाही वेळ देता येतो. आमच्या घरात प्रत्येक दिवाळीला आई घरीच फराळ बनवते, शुटींग मुळे मला बनवायला वेळ नाही मिळत पण जेव्हा मला संधी मिळतो तेव्हा मी तिला नक्की मदत करते. त्यात मला अनारसे खूपच आवडतात. आणि आई ते जरा जास्तच बनवते मग सुट्टीच्या दिवशी नाही म्हंटल तरी ते खाल्ल जातं.

मला आमचं घर सजवायला खूप आवडत. दर वर्षी मी नविन कंदिल आणते, पुन्हा रिपीट करणं मला नाही आवडत. पणत्या लावणं दारा समोर रांगोळी काढण ही कामं नेहमी माझी असतात. घर म्हणजे असं ठिकाण असतं जिथे ती तुमच्या स्वत:ची जागा असते तीथे तुम्ही काही करू शकता, रिलॅक्स होणं असो किंवा मग काम. आणि या वर्षीची दिवाळी तर माझ्यासाठी खूप खास आहे कारण प्रत्येकाच एक स्वप्न असंत स्वत:च घर असाव आणि ते स्वप्न यंदा पूर्ण होणार आहे. मी अत्ताच ठाण्यामध्ये नविन घर घेतलंय आणि आम्ही लवकरच तिकडे शिफ्ट होणार आहोत. मी अत्ता जिथे राहते तिथली गॅलरीही खूप सुंदर आहे. मी दिवाळीत हमखास तिथे दिवे लावते. त्या गॅलरीतून तासन तास बाहेर पाहात बसायला आवडतं.

दिवाळीत आणखी खास गोष्ट म्हणजे जवळचे नातेवाईक, मित्र मंडळी सगळे जणं घरी येतात. ऎरवी पार्टी किंवा काही कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटणं होत असतं पण दिवाळीच्या वेळी सगळेजण घरी एकत्र बसणं गप्पा गोष्टी मग वेगवेगळे विषय निघतात कसां दिवस जातो ना काहीच कळंत नाही. मालिकेच्या सेटवरही दिवाळी सेलिब्रेशन होतं. आणि तेही तिन वेळा खूप मज्जा येते. म्हणजे मागच्या वर्षी आम्ही आमची ऑफीस मधली फॅमिली, खानुलकर फॅमिली आणि मी आणि जयराम जिथे राहतो ती केतकरांची फॅमिली असं तिन वेळा सेलिब्रेशन केलं होतं. आणि सेटवर सगळ्यांना माहिती आहे की मला अनारसे आवडतात. त्यामुळे कोणी ना कोणी हमखास माझ्यासाठी अनारसे आणतात.

मला असं वाटत हे सणं उत्सव नेहमीच आपल्याला आनंद देवून जातात. आणि त्यात दिवाळी तर आणखी स्पेशल, दिव्यांच्या प्रकाशाने आपल आयुष्य प्रकाशमान होतं, विविध रंगाच्या उधळनाने आपल आयुष्य अजुनच कलरफूल होवून जातं हा सण आपल्याला खूप चांगल्या आठवणी देऊन जातो आणि पूर्ण वर्ष अजुन उत्साहाने काम करण्याची प्रेरणा देतं नाही का. माझ्या कडून तुम्हां सर्वांना दिवाळीच्य हार्दिक शुभेच्छा.

------------------