Sign In New user? Start here.
 sushrut-bhagwat-now-working-as-director सध्या मराठी अनेक नवीन चेह-यांनी सिनेसृष्टीत प्रवेश घेतला आहे. अनेक तरूण दिग्दर्शकही चांगले विषय घेऊन आपलं दिग्दर्शकीय पर्दापण जोशात करीत आहेत. त्यातलचं एक नाव म्हणजे सुश्रृत भागवत यांचं... पी.जी या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पर्दापण करीत आहेत..
 
 
zagmag

"बालकालाकार ते दिग्दर्शक असा प्रवास करणा-या सुश्रृत भागवत यांचं दिग्दर्शन क्षेत्रात पर्दापण"

सध्या मराठी अनेक नवीन चेह-यांनी सिनेसृष्टीत प्रवेश घेतला आहे. अनेक तरूण दिग्दर्शकही चांगले विषय घेऊन आपलं दिग्दर्शकीय पर्दापण जोशात करीत आहेत. त्यातलचं एक नाव म्हणजे सुश्रृत भागवत यांचं... पी.जी या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पर्दापण करीत आहेत...

दुनियादारी, अवंतिका, रेशीमगाठी, श्रावणसरी, कुलवधू यांसारख्या मालिकांमध्ये आपलं अभिनय कौशल्य सुश्रृत भागवत यांनी दाखवल आहे.... सह्याद्री वाहिनीच्या "इथे नांदतो बाळ" मालिकेतून प्रेक्षकांच्यासमोर आलेल्या बाळूने अभिनयाचं कसब दाखवल्यानंतर आपला मोर्चा दिग्दर्शन क्षेत्रात वळवला.... सुश्रृत यांनी वयाच्या १० वर्षी अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली "स्वप्नांच्या पलिकडले" या मालिकेपासून त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून दिग्दर्शनाला सुरूवात केली...

त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक अशा तब्बल १४ मालिकांसाठी दिग्दर्शन केलं... बालाजी टेलिफिल्मसची "माझिया प्रियाला प्रित कळेना", हे बंध रेशमाचे", ऒळख", लक्ष्य, आबंट गोड, अस्मिता, लेक लाडकी ह्या घरची, पुढंच पाऊल, मांडला दोन घडीचा डाव, लज्जा, अरूंधती, सुहासिनी , अशा मालिकांच, तस सखी, विभावंतर, या नाटकांच दिग्दर्शन करत आपल्या दिग्दर्शनाचा प्रवास त्यांनी कायम ठेवला.... ह्या प्रवासातचं त्यांनी पटकथा लेखक तसचं सहायक दिग्दर्शक म्हणून सौ.शशी देवधर या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली... त्यानंतर आता त्यांचे पी.जी आणि मुंबई टाईम्य असे दोन सिनेमे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

 

 

------------------