Sign In New user? Start here.
tejashree pradhan share photos on twitter  तेजश्री प्रधानची लंडन वारी
 
 
zagmag

"तेजश्री प्रधानची लंडनवारी"

marathi celebrities holi special

मालिका संपलीतरी चाहत्यांना आपले लाडके कलाकार सध्या काय करत आहे याची उत्सुकता असते. 'होणार सून मी या घरची' मालिका संपून बरेच दिवस झाले असले तरी मालिकेतील जान्हवीची क्रेझ अजून आहे तशीच आहे. जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान सध्या तिच्या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. तिच्या नाटकाचे प्रयोग परदेशात सुरू आहेत.

मालिक संपायच्या आधीच तेजश्रीने तिचे नाटकांचे प्रयोग सुरू केले होते, पण मालिका संपताच तिने आता संपूर्णपणे लक्ष नाटकांवर केंद्रिंत केले आहे. सध्या तिचं कार्टी काळजात घुसलीचे या नाटकाचे प्रयोग लंडनमध्ये होत आहे. यामुळे या नाटकाची संपूर्ण टीम लंडनमध्ये आहे.

मालिका संपल्यानंतर तेजश्री काय करत असेल याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. नुकतेच तेजश्रीने तेथील काही फोटो ट्विटरवर अपलोड केलेत. यावरून तरी नाटकांच्या प्रयोगात सध्या बिझी असल्याच चित्र आहे.

------------------------------------------.