Sign In New user? Start here.
tejashri with sharman "तेजश्री प्रधान चे हिंदी रंगभूमीवर पदार्पण
 
 
zagmag

तेजश्री प्रधान चे हिंदी रंगभूमीवर पदार्पण

tejashri with sharman

जान्हवी म्हणजेच 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतील तेजश्री प्रधान सध्या रंगभूमीवर आपला चांगलाच जम बसवलेला दिसत आहे. प्रशांत दामले यांच्या सोबत 'कार्टी काळजात घुसली' या नाटकाचे तिने अंसख्य प्रयोग केले. या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रातच नाही तर परदेशातही झाले. आता ती या नाटकासोबतच हिंदी रंगभूमीवर पदार्पण करत आहे. अभिनेता शर्मन जोशी सोबत ती या नवीन नाटकात दिसणार आहे.

'मैं और तू' या हिंदी नाटकाचे पहिले पोस्टर ट्विट करुन कमिंग सून असे लिहिले होते. ट्विटरवर तेजश्रीने शर्मन जोशीची पोस्ट रिट्विट केली असून ''Yessss it's a PLAY #MainAurTum. keep loving n keep blessing'', हे लिहिले आहे. या हिंदी नाटकाची निर्मिती आणि दिग्दर्शन स्वतः शर्मन जोशीने केले आहे. हे एक रोमँटिक कॉमेडी नाटक असून 'सम टाइम नेक्स इयर' या इंग्रजी नाटकावर आधारित आहे.

------------------------------------------.