Sign In New user? Start here.
udaya tikekar and swanandi Tikekarसिध्दार्थ जाधव आणि नेहा जोशी पहिल्यांदा एकत्र मोठया पडद्यावर दिसणार आहेत. या वेगळ्या धाटणीचा सिनेमा मधे सिध्दार्थ जाधव सलग १५ दिवस नेहाजोशीला मारत असतो. एकदंरित या गोष्टीवरून तुमच्या लक्षात येईल की नेमक चित्रपटात काय होणार आहे..
 
 
zagmag

माझे सर्व सिक्रेट्स बाबांना माहित आहे

रंगत संगत’, ‘काफिला’, ‘सातच्या आत घरात’, ‘अनोखे हे घर माझे’, ‘बागी’, ‘लाल सलाम’ ‘सतरंगी रे’ या अनेक गाजलेल्या चित्रपटातून, वेगवेगळ्या मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते म्हणजे उदय टिकेकर. ते एक चांगले अभिनेते असल्याचे आपणा सर्वांना माहित आहेच. मात्र ते एक वडील म्हणून कसे आहेत, आपल्या घरासाठी कसा वेळ काढतात, काय धमाल करतात याबाबत सांगते आहे त्यांची मुलगी स्वानंदी टिकेकर....

अभिनेता उदय टिकेकर म्हणजेच माझे बाबा एक माणूस म्हणून खूप चांगले व्यक्ती आहेत. माझी आई सुद्धा मला नेहमीच सांगते की, ‘एक चांगला माणूस होण्यासाठी जे गुण हवेत, ते सर्व गुण माझ्या बाबांमध्ये आहेत’. कितीही मोठे झाले तरी माणूसपण जपणारी माणसं आज फार कमी असतात. कामाच्या बाबतीतही ते अतिशय पर्टीक्युलर आहेत. म्हणजे माझंही कधी नाटक असेल तर मला घेऊन बसतात, स्क्रिप्ट वाचतात, त्यात आणखी काय करता येईल याची चर्चा करतात. माझ्या कॅरेक्टरवर कसं वर्कींग करता येईल याचाही विचार करतात. काहीही अडचण आली, तर ते नेहमी मार्गदर्शन देतात. क्रिटीसाईज करतात आणि याच गोष्टीमुळे मला चांगलं काम करण्याची आणखी उर्मी येते. जसं म्हणतात की, एक मुलगी आई पेक्षा बाबाच्या जास्त जवळची असते, तसंच माझ आहे. माझ्या सर्व गोष्टी, माझे सर्व सिक्रेट्स बाबांना माहित आहे. बाबांची आणि माझी एक वेगळी टीम आहे, आईपासून काही गोष्टी लपवायची.

एक कलाकार म्हणून म्हणून बाबांबद्दल मला खूप रिस्पेक्ट आहे. इतकी वर्ष इंडस्ट्रीत असून सुद्धा कुठलंही नवीन काम आलं, तरी तितक्याच नाविन्याने त्या कामाकडे ते बघतात. आजकाल ही गोष्ट खूप कमी पहायला मिळते...जर आजची मुलं पाहिली, तर आपल्या लक्षात येईल की, त्यांनी एखादी सिरीयल किंवा सिनेमा केल्यावर ते खूप मोठे स्टार झाल्यासारखे त्यांना वाटायला लागते. पण आजही मी जेव्हा जेव्हा बाबांच्या शूटींग सेटवर जाते, तेव्हा तेव्हा मी त्यांना प्रॅक्टीस करतानाच बघते, कुठल्याही प्रकारचा टाईमपास सेटवर ते करतांना दिसत नाहीत. एखाद्या नवीन कलाकाराने काम करायला हवं, तसं काम बाबा आजही इतक्या वर्षांनंतर करतात. एक चांगला अॅयक्टर आणि एक चांगला माणूस असं बाबांमध्ये खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे.

माझं आणि बाबाचं रिलेशन अगदी चिल्ड आहे. मी म्हणेन की, ते जगातले सर्वात चांगले बाबा आहेत. आमचं नातं इतकं फ्री आहे की, मी माझ्या लेक्चर मधून सुद्धा कधी कधी त्यांना मॅसेज करते. की, काय चालू आहे..मॅम खूप बोर करताहेत...कंटाळा आलाय...असं आमचं टेक्स्टींग चाललेलं असतं. नुकतीच आम्ही एक नवीन बुलेट घेतलीय. त्यामुळे बाबा जेव्हाही घरी असले की, बुलेटवरून बाहेर फिरायला आम्ही जात असतो. किंवा घरी असलो की, फक्त दिवसभर टीव्ही बघत बसतो, अशी सगळी आमची धमाल चालू असते. मला वाटतं माझ्या लेव्हलचं आमचं रिलेशन आहे. त्यांचं वय विसरून ते माझ्या वयाचे होऊन माझ्याशी वागतात आणि संवाद साधतात. आमच्या या रिलेशनप्रमाणेच त्यांनी कधीच मला कोणती गोष्ट करायला विरोध केला नाही. ते असे कधीही म्हणाले नाही की, तू कला क्षेत्रात ये किंवा येऊ नको. त्यांचं म्हणणं आहे की, तुला ज्याच्यात आनंद मिळतो ते तू कर. मी अजूनही खूप काही केलेलं नाहीये. बाबांनी सुद्धा त्यांच्या करीअरची सुरवात कॉलेज लेव्हल वरूनच केली होती. त्यामुळे ते म्हणतात, तू आधी अभ्यास आणि त्यानंतर निर्णय घे. तुझा बेस आधी पक्का कर, हे त्यांचं सांगणं असतं.

त्यांच्यातली सर्वात जास्त मला आवडणारी गोष्ट म्हणजे, ते कुणालाही नाही म्हणू शकत नाही. घरी कुणीही काही मदत मागायला आले की, अहो उदयजी मला जरा हे पाहिजे. ते कधीच त्यांना नाही म्हणणार नाही. ही गोष्टी चांगली सुद्धा आहे आणि वाईट सुद्धा....! या त्यांच्या स्वभावामुळे लोकं जमतात. वाईट गोष्ट म्हणजे काही लोक त्याचा फायदाही घेतात. पण ही क्वालिटी चार माणसं जोडायला खूप चांगली आहे, असं मला वाटतं.

मी लहान असतांना बाबावरून झालेल्या अनेक गमती जमती सुद्धा लक्षात आहेत. त्यातीलच एक म्हणजे, ‘रंगत संगत’ नावाचा चित्रपट होता. त्यात बाबा, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक शिंदे आणि रमेश भाटकर असे कलाकार होते. या सिनेमात बाबांना एके ठिकाणी मारण्याचा सीन आहे. ते पाहून मी अक्षरश: रडायला लागायचे. नुसती रडायचे नाहीतर ओक्सा-बोक्सी रडायचे की, माझ्या बाबा ला का मारताय...! एक-दोनदा तो सीन मी बघीतला त्यानंतर ते बघणंच सोडून दिलं होतं. दुस-या खोलीत निघून जायचे किंवा डोळे मिटून बसायचे. पण नंतर बाबा जवळ घेऊन समजावून सांगायचे आणि हसायचेही.

त्यांना जर या माध्यमातून झाल्यास मी त्यांना हेच सांगेन की, 'As you are always there, be there for me’,love you lot..! आणि स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्या. जी तुम्ही कधीच घेत नाही. तब्येतीबद्द्ल मी सांगते ते ऎका...!

 

------------------