Sign In New user? Start here.
urmila at puneअभिनेत्री उर्मिला मातोंडकर म्हणाली. पु.ना गाडगीळ ज्वेलर्सच्या पुण्यातील पौड रस्ता येथील दालनाचे नूतनीकरण केलेल्या दालनाचे उदघाटन उर्मिलाच्या हस्ते करण्यात आलं.
 
 
zagmag

आईने दिलेला दागिना माझा सर्वात आवड्ता : उर्मिला मातोंडकर

urmila at pune

नाशिकच्या दालनाच्या उदघाटनप्रसंगी माझी दाजीकाकांशी भेट झाली. त्यांचा माझ्यावर भेटी दरम्यान विशेष प्रभाव प्रडला. काही लोंक असे असतात की ज्यांच्याबद्दल आपल्याला आदर व आपुलकी वाटते, अशीच भावना त्यांना भेटल्यावर होती. असं अभिनेत्री उर्मिला मातोंडकर म्हणाली. पु.ना गाडगीळ ज्वेलर्सच्या पुण्यातील पौड रस्ता येथील दालनाचे नूतनीकरण केलेल्या दालनाचे उदघाटन उर्मिलाच्या हस्ते करण्यात आलं.

दागिन्यांबद्दल बोलताना ती पुढे म्हणाली की प्रत्येक स्त्रीला असते तितकीच अन तेवढीच मला दागिन्यांची आवड आहे. सोन्याच्या दागिन्यांना काही काळाच्या मर्यादा नसते. सोन्याचे दागिने हे फॅशन आणि स्टाईल पलीकडचे असतात. सोन्याच्या दागिन्यांच महत्व भारतीय संस्कृती देखील तितकच् महत्वाच आहे. वेळ, फॅशन आणि स्टाइअलच्या पुढे जाणारी गोष्ट म्हणजे सोन्याची ज्वेलरी आहे. मला सोन्याचे दागिने आवडतात. मला स्वत:ला नेक पिसेस म्हणजे अगदी गळ्याला चिकटून असणारे दागिने आवडतात. माझ्या खूप सा-या फिल्ममधे मी असे नेकपीस वापरले आहेत. नेकपीस खूप कमी लोंकाना चांगले दिसतात पण माझी मान उंच असल्यामुळे माझ्यावर ते जास्त खुलून दिसतात. माझा सर्वात आवडता दागिना म्हणजे माझ्या आईने गिफ्ट दिलेली अंगठी. ती मी अगदी जपून वापरते कारण ती मला आवडते आणि ती माझ्या आईने दिल्यामुळे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे.

 

------------------