Sign In New user? Start here.
small-sachin-conned स्वप्नीलचे एस. जे. कलेक्शन चाहत्यांसाठी खुले"
 
 
zagmag

४२ व्या वर्षी उर्मिला अडकली विवाह बंधनात

Urmila Matondkar

मुंबई – कोणला कोणत्या वयता स्वत:चा लाईफ पार्टनर मिळेल हे काही सांगता येत नाही. असंच काही झालं आहे मराठमोळी उर्मिला सोबत . प्रिती झिंटा पाठोपाठ ४२ वर्षीय अभिनेत्री उर्मिला मातोंडकर देखील लग्नबंधनात अडकली आहे. काश्मिरच्या बिझनेसमन – मॉडेल मिर मोहसिन अख्तरसोबत विवाहबद्ध झाली आहे. ९० च्या दशकात साऱ्यांना हो जा रंगीला म्हणत तीने बॉलीवूडमध्ये स्वत:च स्थान निर्माण केल.

Urmila Matondkar

लग्नसोहळा पार पडल्यावर उर्मिला मातोंडकर म्हणाली की, मला आमच्या विवाह सोहळा खूप खास आणि खाजगी ठेवायचा होता. फक्त घरातील मंडळी आणि काही मित्र परिवार या सोहळ्याला उपस्थित होते. फॅशन डीझायनर मनिष मल्होत्राने उर्मिला आणि मिरची ऒळख करून दिली. या लग्नाला मनिष मल्होत्राही उपस्थित होता. उर्मिला मिरपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. मिर मोहसिन अख्तर हा काश्मिरी बिझनेसमॅन आहे. त्याला मॉडेलिंगमध्ये करिअर करायचे होते पण कुटुंबासाठी त्यांने व्यवसाय सांभाळला. मिर ने "मुंबई मस्त कलंदर" आणि ‘it’s a Man’s World’ या चित्रपटातही त्याने काम केलं आहे.