Sign In New user? Start here.
 vaibhav birthday celebrationवाढदिवस आपल्या जवळच्या व्यक्ती सोबत सेलिब्रेट केलातर ते सेलिब्रेशन आपल्यासाठी खास असंत नाही का? असंच बर्थडे सेलिब्रेशन वैभवने आज फिल्मच्या सेटवर केलं तेही प्रार्थना सोबत
 
 
zagmag

वैभव आणि प्रार्थना ने एकत्रित केलं बर्थडे सेलिब्रेशन

vaibhav birthday celebration

वाढदिवस आपल्या जवळच्या व्यक्ती सोबत सेलिब्रेट केलातर ते सेलिब्रेशन आपल्यासाठी खास असंत नाही का? असंच बर्थडे सेलिब्रेशन वैभवने आज फिल्मच्या सेटवर केलं तेही प्रार्थना सोबत. वैभव आणि प्रार्थना ने एकत्रीत ३ फिल्मस केल्या आहेत त्यामुळे त्यांच्यातील मैत्रीच बॉंडींग खूप चांगल झाल आहे. त्यामुळे आपल्या खास मैत्रीणी सोबत सेलिब्रेट केलेला हा बाढदिवस वैभवला चांगलाच लक्षात राहील.

काही दिवसांपुर्वी अभिनेता वैभव ने खास आपल्या फॅन्स सोबत स्वत:चा वाढदिवस साजरा केला. तो पहिल्यांदाच स्वत:च्या फॅन्स ना भेटत होता. या वेळी खास केप कापून सेलिब्रेशन करण्यात आलं.त्याच्या वाढदिवसासाठी खास त्याच्या जवळच्या व्यक्तीने शुभेच्छा दिलेला व्हिडीयो यावेळी दाखवण्यात आला. हा विडीयो पाहून तो खूपच भावूक झाला. यावर तो म्हणाला की यामध्ये माझ्या आई बांबानी दिलेल्या शुभेच्छा खूपच आवडल्या. कारण आमच्या इथे पुणे किंवा मुंबई मधली लोक जसे आपल्या आई वडलांन बद्दलच प्रेम व्यक्त करतात तस आमच्या इथे सहसा केलं जात नाही. त्यामुळे विडीयो व्दारे दिलेल्या शुभेच्छा मला खूपच आवडल्या. आणि यामध्ये माझे अनेक मित्र जे अमेरिकेत असतात आम्ही वर्षानुवर्ष भेटत नाही पण त्यांनी मला आवुर्जून विश केलंय मला मनापासून हा विडीयो आवडला.

मी कॉलेज मधे असताना मी सहज जरी म्हणालो की मला हिरो व्हायच तरी लोकांच्या नजरा बदलून जात होत्या. पण ते म्हणतात ना किसी को अगर दिल से चाहो तो उसे दिलाने के लिये पुरी कायनात जुट जाती है. असंच काहीस माझं झालं. माझ्या या स्वप्नमुळे माझ्या बांबानाही खूप ऎकून घ्याव लागल होत. पण माझ यश पाहता त्यांनाही माझा अभिमान वाटतो. मला आजच्या यंगस्टर ना एकच सांगायच आहे तुमच्या स्वप्नांना फॉलो कर आणि मगच पैशाला.

------------------