Sign In New user? Start here.
milind ingle's new music album "प्रिया बापट, सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर अशी वजनदार स्टारकास्ट!!"
 
 
zagmag

वजनदार’ द्वारे प्रिया बापटचे पार्श्व गायनामध्ये पर्दापण!!

जाड माणसांना टेन्शन असतं ते बारीक होण्याचं… जाड असण्यापासून ते बारीक होण्याच्या प्रवासाची मजेदार गोष्ट ‘वजनदार‘ चित्रपटातून प्रेक्षकांपुढे येणार आहे. विधि कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्सची निर्मिती असलेला 'वजनदार' हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे दिवाळीच्या फराळावर मनसोक्त ताव मारल्यानंतर प्रेक्षकांना वजनदार मनोरंजन मिळणार आहे.

<P.मुंबई मध्ये नुकत्याच एका समारंभात "वजनदार" या चित्रपटातील 'गोलू पोलु' असे शब्द असलेले गाणं प्रदर्शित करण्यात आलं. मराठी चित्रपटसृष्टी मध्ये पार्श्वगायिका म्हणून पदार्पण करणारी अभिनेत्री प्रिया बापट हिने तिचा सहगायक रोहित राऊत यांच्यासह हे गाणं प्रत्यक्ष सादर केलं. हे गाणं प्रिया बापट आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्यावर चित्रित झाले आहे. सई ताम्हणकर यांनी प्रिया बापटना गाणं गाण्यासाठी आमंत्रित केले. गाण्याचा विडीओ सिद्धार्थ चांदेकर ह्यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. नाविन्यपूर्ण शब्द असलेलं हे गाणं ओंकार कुलकर्णी ह्यांनी लिहलेले आहे. अविनाश-विश्वजित यांनी या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केले आहे. या सभारंभाला सई ताम्हणकर, प्रिया बापट,सिद्धार्थ चांदेकर, चिराग पाटील, चेतन चिटणीस, लेखक व दिग्दर्शक सचिन कुंडलकर, निर्माती विधि कासलीवाल आणि इतर कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.

'सांगतो ऐका' या चित्रपटाच्या निर्मितीनंतर लॅन्डमार्क फिल्म्स आता पुन्हा एकदा नवा विषय घेऊन येत आहेत. विधि कासलीवाल चित्रपटसृष्टीची मोठी पार्श्वभूमी आहे. बडजात्या कुटुंबाशी त्या संबंधित आहेत. राजश्री फिल्म्सच्या विवाह या चित्रपटासाठी त्या सहायक दिग्दर्शक होत्या. तसंच 'इसी लाईफ में' या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. आता वजनदार माणसांची 'वजनदार' गोष्ट त्या सादर करत आहेत. गेलं वर्षभर 'वजनदार' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचे टीजर्स, पोस्टर आणि ट्रेलरला सोशल मीडियात भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

मराठी इंडस्ट्रीतल्या ग्लॅमरस आणि स्टार अभिनेत्री सई ताम्हणकर, प्रिया बापट, चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर यांच्यासारखे 'वजनदार' फॅन फॉलोईंग असलेले कलाकार या चित्रपटात आहेत. त्याशिवाय माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा सुपुत्र चिराग पाटील, चेतन चिटणीस हे नव्या दमाचे कलाकारही या चित्रपटात आहेत. त्यामुळे आशयविषयासह भरभक्कम मनोरंजन प्रेक्षकांना नक्कीच अनुभवता येईल.

 

------------------