Sign In New user? Start here.
Vidya-Balan-in-Marathi-Film आता विद्या बालन जर मराठीत चित्रपटात उलाला करताना दिसली तर आर्श्चय करू नका. कारण विद्या बालन मराठी चित्रपटात पदार्पण करणार आहे.
 
 
zagmag

विद्या बालन मराठी सिनेमात

Vidya Balan in Marathi Film

अगदी काही दिवसांपूर्वी झगमग टीम ने जेव्हा "विद्या बालनला" विचारल होतं की तू मराठी चित्रपटात काम करणार का? यावर ती म्हणाली मला चांगला रोल मिळाला तर मी नक्की करेन. आणि तिने हे तिच म्हंणन खरं करून दाखवलं आहे. आता विद्या बालन जर मराठीत चित्रपटात उलाला करताना दिसली तर आर्श्चय करू नका. कारण विद्या बालन मराठी चित्रपटात पदार्पण करणार आहे. जेष्ठ अभिनेते भगवान दादा यांच्या जीवनावर आधारीत 'एक अलबेला' ती अभिनय करताना दिसणार आहे. या चित्रपटात भगवानदादांची भूमिका मंगेश देसाई करणार असून गीता दत्तची भूमिका विद्या बालन करणार आहे. विद्याच बालपण मुंबईत गेलं असून तिला खूप मराठी बोलता येतं. पण तीची स्वत:ची मराठी भाषा सुधारण्यासाठी अजून प्रयत्न करत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटात विद्या ला काम करताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

या सिनेमांच शूटिंग आजपासून सुरू झालं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शेखर सरतांडेल करत आहेत. गेल्या काही वर्षात अमराठी कलाकारांच मराठी चित्रपटांकडे वळण्याच प्रमाण वाढल आहे. मग ते अक्षय कुमार असो किंवा अगदी सलमान खान. अशा कलाकारांच्या येण्यामुळे मराठी चित्रपटांची फॅन्स फॉलोईंग मध्ये आणखी भर पडेल यात शंका नाही. आण त्याच बरोबर मराठी बॉक्स ऑफीसवरचे कलेक्शनही वाढेल अशी तुरतास तरी आशा करण्यात काही हरकत नाही.

------------------