Sign In New user? Start here.
 Vidya Balan inauguratiing the 9th showroom of Ranka Jewellers मराठी चित्रपटात काम करण्याची माझी खूप इच्छा आहे. माझ्याकडे मराठी चित्रपटाच्या खूप ऑफर्स आहेत, पण मी चांगला रोल आणि स्क्रिप्ट च्या प्रतिक्षेत आहे. अस मत विद्या बालन ने व्यक्त केलं.
 
 
zagmag

"मराठी चित्रपटात काम करण्यासाठी चांगल्या स्क्रिप्टच्या प्रतिक्षेत."

मराठी चित्रपटात काम करण्याची माझी खूप इच्छा आहे. माझ्याकडे मराठी चित्रपटाच्या खूप ऑफर्स आहेत, पण मी चांगला रोल आणि स्क्रिप्ट च्या प्रतिक्षेत आहे. अस मत विद्या बालनने व्यक्त केलं. ती पुण्यात रांका ज्वेलर्सच्या नवीन दालनाचे उदाघाटनसाठी आली होती. तसेच रांका ज्वेलर्सनी तयार केलेल्या तब्बल ५१ लाखांच्या सोन्याच्या पैठणीचेही अनावरण देखील यावेळी करण्यात आले. या पैठणीला सुमारे दीड किलो सोन्यानी मढविण्यात आले असून तिची किंमत तब्बल ५१ लाख रुपये आहे. गेले ३ महिने सुमारे ३५ कारागिरांचा संघ ही अद्वितीय पैठणी तयार करण्यात गुंतला होता.

मराठी चित्रपट निर्मिती बद्दल विचारल असता विद्या म्हणाली. मराठी चित्रपट निर्मिती मध्ये अनेक हिंदी कलाकार येत आहेत. पण सध्या तरी तशी माझी कोणतीच इच्छा नाही. मला मराठी चित्रपटासाठी खूप ऑफर्स आल्याही पण तशी चांगली स्क्रीप्ट आणि भूमिका मला न मिळाल्याने सध्या शांत आहे. पण चांगली ऑफर येताच मी नक्की मराठी चित्रपटात काम करेन. माझं मराठी सुधरवण्यासाठी मी विशेष प्रयत्न करत आहे.महाराष्ट्रातली पैठणी मला खूप आवडते. मला जवळच्या व्यक्तीने मरूम कलरची पैठणी गिफ्ट केली होती ती मी आवर्जून नेसते.

 

 

------------------