Sign In New user? Start here.

करा, महिलांचा रिस्पेक्ट

आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था महिलांतर्फेच चालवल्या जातात. या विविध संस्थांपैकी मोजक्याच अशा संस्था असतात, ज्यांच्या लढय़ाला यशाचे मार्ग गवसतात. पुण्यातील अशीच एक ‘सखी’ ही संस्था.

 

करा, महिलांचा रिस्पेक्ट

आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था महिलांतर्फेच चालवल्या जातात. या विविध संस्थांपैकी मोजक्याच अशा संस्था असतात, ज्यांच्या लढय़ाला यशाचे मार्ग गवसतात. पुण्यातील अशीच एक ‘सखी’ ही संस्था. संस्थापिका अंजली पवार यांना नुकताच जागतिक स्तरावरील ‘वुमेन्स इंटरनॅशनल सेंटर’ च्या वतीने सिस्टरशिप पुरस्कार देण्यात झाला. त्यांच्याशी महिलांच्या प्रश्नांबद्दल महिला दिनानिमित्ताने साधलेला विशेष संवाद..anjaliपरदेशी दिल्या जाणाऱ्या मुलांच्या बाबतीत झालेले गैरव्यवहार असोत किंवा लहान मुलांचे शोषण असो वा महिलांवर होणारे अत्याचार असो, याविरोधात खंबीरपणे साथ देण्यासाठी आणि गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठी ही संस्था सतत कार्यरत असते. पुण्यातील प्रीत मंदिर संस्थेत झालेला दत्तक मुलांबाबतीतला घोटाळा अंजली पवार यांनी उघड केला.

परदेशी दिल्या जाणाऱ्या दत्तक मुलांचे अनेक प्रश्न आहेत. त्यासंदर्भातील कामासाठी तुम्हाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल थोडं सांगा.

१९८३-१९८४ च्या सुमारास कोलकात्ता येथे परदेशी दत्तक दिल्या जाणाऱ्या मुलांच्या संदर्भातील एक मोठं स्कॅम घडलं होतं. या इश्यूला घेऊन सुप्रीम कोर्टाकडून एक मोठं जजमेंट आलं. त्यानुसार अनेक गाईडलाइन समोर आल्या. आणि त्याअंतर्गत एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली. परंतु अडॉप्शन आणि इंटरनॅशनल अडॉप्शन या दोन गोष्टींमध्ये खूप पैसा आहे. परदेशात आज जर एखादं मूल दत्तक घेतलं गेलं तर त्याची किंमत ५ हजार डॉलर आहे. इंडियन पालकांसाठी ४० हजार अशी किंमत आहे. या दोनपैकी अर्थातच परदेशी किंमत जास्त आहे. यामुळे झालं काय की, परदेशात मुलं खूप जास्त दत्तक दिली जाऊ लागली. परदेशात मुलं दत्तक देतांना किती मुलं भारतातून दत्तक दिली जावी, यावर काही बंधने नव्हती. त्यामुळे दत्तम मुलं देणाऱ्या संस्थांनी हा धंदाच करून टाकला आहे. मग ते मद्रास स्कॅम असो, कोलकाता स्कॅम असो की, पुण्यातील असो, सगळीकडे या गोष्टीचा व्यवसाय झालाय. माझं सगळ्यात महत्त्वाचं ऑॅब्जेक्शन आहे ते बेकायदा मुलांना दत्तक देणे यावर.. जसं मुलांना चोरून आणणे, पालकांची दिशाभूल करणे, पालकांना कोणतीही पूर्वमाहिती न देता मुले दत्तक देणे अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. परिस्थिती वाईट असल्यामुळे या संस्थांमध्ये घातली गेलेली मुले पालकांना न सांगता परदेशी दत्तक दिली जातात. हरवलेल्या मुलांच्या आई-वडिलांचा शोध न घेता त्यांनाही दत्तक दिले जाते. आई-वडील इकडे आपल्या मुलांना शोधत असतात. पण त्यांना हे माहीत नसतं की आपलं मूल तर परदेशात विकलं गेलं आहे. मुलं दत्तक देण्याच्या नियमावलीत परदेशात मुलं दत्तक देण्याचं ऑॅप्शन सर्वात शेवटचं आहे. त्याआधी अनाथ आश्रम किंवा नातेवाइकांकडे मुलांना सोपवणे, नाही तर इंडियन अडॉप्शन हा मार्ग आहे आणि जर इंडियन अडॉप्शन नाही झालं तर शेवटी परदेशात मुलांना दत्तक देता येतं. मात्र आज असे प्रयत्न होताना दिसतात की, आधीच्या ऑॅप्शन्सकडे दुर्लक्ष करून थेट परदेशात मुलं दत्तक दिली जातात. कारण यातून पैसा भरपूर मिळतो. अशा गोष्टींच्या विरोधात मी ‘सखी’ आणि ‘अद्वेत फाऊंडेशन’ या संस्थांच्या वतीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मी या गोष्टींच्या विरोधात ठामपणे उभी राहिल्याने २००७ रोजी मला जिवे मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला. अनेक ऑॅफर्स दिल्या गेल्या, मात्र या कशालाही न घाबरता मी सतत लढत आहे. अनेक पातळ्यांवर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न संबंधित संस्थांकडून करण्यात आला होता. एकंदर काय तर जी मुलं प्रोटेक्शन केअरमध्ये येतात, त्यांना सांभाळणं शासनाची जबाबदारी आहे. आणि कुठे तरी मला असं वाटतं की शासन यात फेल होतंय. म्हणून ती मुलं अशाप्रकारे अवैधरित्या बाहेर पाठवली जात आहेत. म्हणजे काय तर वेगवेगळ्या फंडांच्या नावाखाली ही मुले परदेशात विकली जात आहेत. पुण्यातील अशाच एका संस्थेचा मी पर्दाफाश केला म्हणून मला हा कॅलिफोर्नियाच्या संस्थेकडून सिस्टरशिप पुरस्कार देण्यात आलाय.

आज महिलांवर अनेक प्रकारचे अत्याचार होताहेत. त्याबाबत तुमच्याकडून काय भूमिका बजावली गेली आहे?

खरं तर प्रत्येकाला संविधानाने दिलेल्या अधिकारांमध्ये मी विश्वास करते. ते अधिकार मिळवायची जर तुमची तयारी असेल तर मी तुमच्या बरोबर आहे. कोणत्याही टोकाला मी तुमच्यासाठी लढायला तयार आहे, पण तुम्ही लढायला तयार असाल तरच. हा विचार मी महिलांच्या समस्यांबाबत पाळते. मुलांच्या समस्यांबाबत मी तसं करत नाही. कारण त्यांना त्यांच्यासोबत होत असलेल्या अत्याचाराबाबतची जाणीव नसते. अनेक केसेस आहेत ज्या आम्ही लढतोय. त्यात महिलांवर झालेली बळजबरी, विवाहित स्त्रियांवरील अत्याचार, भोंदूबाबाने केलेला शारीरिक छळ, अशा काही केसेस आहेत. या सर्वामध्ये मी सतत मदत करायला तयार असते, पण जर तुम्ही स्वत:च्या हक्कांसाठी लढायला तयार असाल तरच मी मदत करते, अन्यथा नाही म्हणून सांगते.

सरकारतर्फे अनेक पातळ्यांवर महिलांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो, याबाबत काय वाटतं तुम्हाला ?

या सर्वामध्ये एक मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे, आपल्याकडे लॉ इम्प्लिमेंटची जी बॉडी ती बऱ्याचदा वेळखाऊ ठरते. उदाहरण द्यायचं झालं तर उरळीकांचनची एक १५ वर्षाची मुलगी IJjwa3Yजिच्यावर अत्याचार झालाय. ती पोलीस स्टेशनला गेल्यावर तिला सांगितलं जातं की, जा तुझ्या आई-बापाला घेऊन ये.! ही कुठली मानसिकता आहे. त्यांच्याविरुद्ध मी गुन्हा दाखल केला आणि त्यावर स्टे आणायला ते लोक हायकोर्टात गेले. सांगायचं एकच आहे की, ही लॉ इम्प्लिमेंट बॉडी अ‍ॅक्टिव व्हावी आणि सेन्सिटिव्ह व्हावी, यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते. मग त्यांच्यावर एक नाही तर १५ केसेस करण्याची माझी तयारी आहे.

एकंदर महिलांच्या बाबतीत ही जी परिस्थिती समाजात बघायला मिळत आहे, त्या मानसिकतेबद्दल काय सांगाल?

ज्या लहान मुलांच्या केसेस आहेत, त्याबाबत पालकही जबाबदार आहेत, असं मला वाटतं. आपण आपल्या मुलांना काय सुविधा देतोय, त्यांचे मित्र कोण आहेत, ते कुठे जातात, पालक त्यांना मोबाइल देतात. आता मोबाइल तुम्ही सिक्युरिटीसाठी दिला असेल. पण त्यात इंटरनेट सुरू करून द्यायची काय गरज आहे? इंटरनेटमुळे आज सगळ्या गोष्टी त्यांना सहज मोबाइलवर बघता येतात. त्यांचं अ‍ॅट्रॅक्शनचं वयच असतं आणि त्या अट्रॅक्शनपोटी ते जर काही पाहत असतील तर त्याचा त्यांच्या मनावर परिणाम होणारच! आज स्वत:च्या घरात बहिणीसुद्धा सुरक्षित नाहीयेत. बरं हा झाला एक मुद्दा. मोठय़ा लोकांच्या विकृती बाबतीत विचार करायचा झाला तर प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्रीचं कमी होणारं प्रमाण हेसुद्धा कारण असू शकतं. ही एक मानसिकता आहे. म्हणजे टीव्ही, सिनेमांमधून आजपर्यंत स्त्रीला फक्त उपभोगाचं साधनंच समजलं गेलं आहे. प्रसारमाध्यमांमधून स्त्रीला तुम्ही काय आणि कसं प्रोजेक्ट करताय, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. शेव्हिंगच्या जाहिरातीत कशाला स्त्रीची गरज आहे? तसेच एअरलाइन्समध्ये २० वर्षाच्या मुलींनाच सव्‍‌र्ह करण्यासाठी का घेतलं जातं? असे अनेक प्रश्न आहेत. म्हणजे काय तर समाजाची स्त्रीकडे बघण्याची दृष्टी बदलणं गरजेचं आहे. आजची तरुण पिढी सेन्सिटिव्ह आहेच. पण सिनेमा, टीव्ही किंवा इतर माध्यमातून त्यांचं प्रोजेक्शन खूप वेगळं केलं जातंय. त्यातूनही ह्या काही गोष्टी घडत असाव्यात, असे म्हणता येईल.

या क्षेत्रात अशाप्रकारे काम असताना आत्ताची जी परिस्थिती आहे, त्याची भीती नाही का वाटली कधी?

मला कधीही कुठेही जाण्याची-येण्याची भीती वाटली नाही. पण आता मी जेव्हा दिल्लीला गेले होते, तेव्हा मला खूप भीती वाटली. याआधी मी कित्येकदा दिल्लीला गेले आहे, मात्र कधी भीती वाटली नाही. मी मुंबई-पुण्यात रात्री बेरात्री उशिरा कामाच्या निमित्ताने फिरत होते. कधीही असुरक्षित वाटले नव्हते. मात्र पहिल्यांदा अशी भीती ह्या सर्व प्रकारांमुळे वाटायला लागली आहे.

महिलांच्या संरक्षणासाठी सरकारने सुचवलेल्या उपाययोजनांव्यतिरिक्त काय काय उपाययोजना करता येतील?

कितीही कायदे, कितीही नियम केलेत तरी ते तोडणारे लोक असतातच. मला काय वाटतं की, प्रत्येक घरात लहानपणापासूनच प्रत्येक बाईशी रिस्पेक्ट करणं शिकवलं गेलं पाहिजे. वर्षानुवर्षे आपण पाहत आलोय की, घरात वडील आईला कशाप्रकारे रागावतात, शिव्या देतात. ते बघून लहान मुलांच्या मनावर परिणाम होतो. लहान मुलांना बऱ्याच घरात लहानपणापासून बाईचा रिस्पेक्ट केलेला बघायलाच मिळत नाही. बाईला घरातील कामंच करावी लागतात. बाई म्हणजे दासी, अशाप्रकारचा एक विचार त्यांच्या मनात रूजतो. त्यामुळे त्यांचा स्त्रियांबाबतचा दृष्टिकोन बदलतो. स्त्रियांना समान समजायला हवेत. जोपर्यंत हे संस्कार घराघरांत लहान मुलांना दिले जाणार नाहीत तोपर्यंत या गोष्टी थांबणार नाहीत. परदेशात तुम्ही जाऊन आलात या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक लोकांच्या भेटी आणि त्यांच्याशी चर्चा होत असतील. यावर काही प्रॅक्टिकल तोडगा निघाला का? परदेशातही अशाप्रकारच्या घटना घडत असतात. तिकडेही ठोस असा काही तोडगा निघालेला नाही. मात्र, तिकडे आज-काल लहान मुलांवरील अत्याचार हा प्रकार खूप वाढला आहे. तिकडच्या लोकांना सेक्समध्ये थ्रिल हवं असतं. त्यासाठी ते आता लहान मुलांचे शोषण करायला लागले आहेत. अलीकडे लहान मुलांच्या पॉर्न फिल्म्सही साइटसवरही उपलब्ध आहेत. या गोष्टींमुळेही मानसिक विकृती लोकांमध्ये जडली आहे.

या सर्व अत्याचारांविरोधात सतत खंबीरपणे उभे राहण्याची ताकद-हिंमत कुठून मिळते ?

माझ्या आईला मी लहानपणापासून पाहत आलीये. ती आरोग्य खात्यात कामाला होती. ती आहे म्हणून आज आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलोय. ग्रामीण भागातले असल्यामुळे लवकरच मुलींचे लग्न करा, असा फोर्स केला जात होता. मात्र, आई खंबीरपणे आमच्या बाजूने उभी राहिली. तिने आम्हाला स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी दिली. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत तिलाही खूप काळजी वाटायची. माझे वडीलसुद्धा सामाजिक कार्यात कार्यरत होते. आई-बाबांचे विचार आमच्यात रूजलेले आहेत. यासोबतच हे सर्व कार्य करताना अनेक लोक मला भेटली, ज्यांच्याकडून मला प्रेरणा मिळते. हिंमत मिळते.

तरुणाईला काय सांगाल?

तरुणाईला सांगेन की, आई, बहीण, पत्नी, मुलीचा रिस्पेक्ट करायला शिका. आणि जिथे कुठे तुम्हाला कुणावर अत्याचार होताना दिसत असेल किंवा कुणाच्या अधिकारांना डावललं जात असल्याचं दिसत असेल, त्यांच्या बाजूने उभे राहा

सौजन्य - yuva magazine

 
 
 
 
 
IMAGE "मन "
मझ्या मनीचे रंग, मलाच नाही कळले विचार करण्या आधीच, सारे...
IMAGE जातो जवळ फ़ुलाच्या तो गुदमरून येतो
सुधीर मुळीक .   Jato javal fulachya to gudamarun yeto जातो जवळ फ़ुलाच्या तो...