Sign In New user? Start here.

 


 
 
 

अवधूत गुप्ते

दिग्दर्शक| संगीतकार | संगीत संयोजक | गायक |

जन्मतारीख :- १८ नोव्हेंबर

परिचय-

अवधूत गुप्ते आज मराठी फिल्म इंडस्ट्रीतला आघाडीचा संगीतकार, गायक, दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. स्वत:च्या एका वेगळ्याच स्टाईलने गाणे कंपोज करण्यासाठी तो चांगलाच प्रसिद्ध आहे. आपल्या धमाल गीतांनी त्याने अवघ्या तरूणाईला भुरळ घातली असून संगीतकार आणि गायक म्हणून आपल्या करीअरची सुरवात करणा-या अवधूत गुप्तेने विविध क्षेत्रात हात आजमावले. त्याने आत्तापर्यंत ‘झेंडा’ आणि ‘मोरया’ या दोन वेगळ्या विषयांवरील यशस्वी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्याने चित्रपटांसाठी तर संगील दिलं आहेच त्याखेरीज त्याने मराठी मालिका आणि नाटकांनाही संगीत दिलं आहे. त्याचबरोबर त्याने अनेक गीते सुद्धा लिहीले असून तो उत्तम संगीत संयोजक सुद्धा आहे.

अवधूतने त्याच्या करीअरची सुरवात केली ती २००२ साली ‘पाऊस’ या अल्बमने...त्यानंतर त्याचा दुसरा अल्बम आला तो ‘ऎका दाजिबा’या अल्बमने अख्या भारतात चांगलीच धूम केली. आणि अवधूत खरी ओळख या अल्बमपासूनच मिळाली. आजही या गाण्याची जादू पहिल्यासारखीच आहे हे विशेष. यानंतर अवधूतला कुणी रोखू शकले नाही. तशी अवधूतने त्याच्या गायनाची सुरवात केली ती १९९६ साली झालेल्या ‘टीव्हीएस सा रे ग म प’ या स्पर्धेतून....‘ऎका दजिबाच्या’ अद्वितीय यशानंतर त्याचा आलेला अल्बम ‘मेरी मधुबाला’ देखील अतिशय लोकप्रिय ठरला. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटांना संगीत दिलं आणि तेही लोकप्रिय झालं. आज अवधूत संगीतात वेगळे प्रयोग करणारा आघाडीचा संगीतकार, गायक म्हणून प्रसिद्ध आहे. संगीताबरोबर त्याची आता एक उत्तम दिग्दर्शक म्हणून सुद्धा ओळख निर्माण झाली आहे. अवधूतबद्द्ल एका ओळीत सांगायचं तर अवधूत गुप्ते हा ‘बहुरंगी’ कलाकार आहे.

 
 

नाटक

तमाशा

(संगीतकार)

 

पुरस्कार

झी गौरव पुरस्कार सर्वोत्कॄष्ट छायाचित्रण

(गंध)(२००९)

झी गौरव पुरस्कार नामांकन (नामांकन)

२००९ (बाई-माणूस)

महाराष्ट्र टाईम्स पुरस्कार (नामांकन)

२००९ नामांकन (गंध)

व्ही.शांताराम पुरस्कार नामांकन (नामांकन)

२००९ (गंध)

महाराष्ट्र टाईम्स पुरस्कार (नामांकन)

२००९ नामांकन (पांगिरा)

 

चित्रपट

गोलमाल

 

मणी मंगळसूत्र

 

प्रतिबिंब

 

संत तुकाराम

 

आरं आरं आबा

 

सनई चौघडे

 

जिंकी रे जिंकी

 

हाय काय नाय काय

 

झेंडा

 

मोरया

 
 
     
 

फोटो

 

व्हिडीओ