Sign In New user? Start here.

Untitled Document

 
     
 

अमित इंगोले
 
म्हणून....

तिला काही सांगावे म्हणून गझल लिहीली,
अजून थोडे जगावे म्हणून गझल लिहीली,

श्वासात अजूनही तिचा गंध तसाच दरवळतोय,
होतं जगवायचं त्याना म्हणून गझल लिहीली,

अजूनही पापण्या मंदावतात अधून मधून,
ते कुणास दिसू नये म्हणून गझल लिहीली,

ना विचारपुस करत आपुलेच अता नेहमीची,
स्वत:च दु:ख गिळावे म्हणून गझल लिहीली,

मद्य घेऊनही नशा ‘तिचीच’ अजूनी भिनलेली,
म्हटलं भानावर यावे म्हणून गझल लिहीली...

अmit