Sign In New user? Start here.

‘व्यथा’

Untitled Document

देवेंद्र गडेकर
‘व्यथा’

मी व्यथाही काय सांगू प्राक्तनाची,
सारखी असते ....कहाणी वेदनांची,

हात धरला का सुखाचा वादळाने,
बाब आहे ही जराशी चिंतनाची,

हारल्यावरही उठे जो जिंकतो तो,
खूप साधी रीत आहे जीवनाची,

कैद तळहातात केले आठवांना,
हीच आहे आज शिक्षा यातनांची,

दु:ख झाले... दु:ख याचे होत नाही,
भूक बघ साऱ्यास असते सांत्वनांची..!

देवेंद्र गडेकर, पुणे