Sign In New user? Start here.

Dry fruit करंजी (कानवले)

 
     
 
 
Dry fruit करंजी (कानवले)
 

साहित्य: सुखं खोबरं पावडर ३ कप, गुलकंद, काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता सगळे बारीक पूड करून, खसखस भाजून सगळे मिश्रण (माप आवडीनुसार घेणे) करून ठेवणे.

मैदा २ वाटी, १/२ वाटी बारीक रवा (रवा१ तास आधी दुधात भिजवून ठेवणे) मिळून दुधात भिजवून २ तास ठेवणे. भिजवताना १ चमचा तूप घालून ठेवणे. १/३ पिठाचा गोळा बाजूला घेऊन त्यात केशर घालून ठेवणे. पीठ घट्ट हवे नाहीतर नंतर करंज्या मऊ पडतात.

सारणासाठी- तूप आणि कॉर्न्फलोवेर फेसून साधारण अर्धी वाटी होईल एवढे फेसून ठेवणे.

कृती- पीठ भिजल्यावर, १ मोठा गोळा घेऊन पोळपाटभर पोळी होईल इतकी मोठी लाटणे (चापातीपेक्षा थोडी जाड). त्यावर सारणाची पेस्ट लावणे (खूप जास्त नको नाहीतर तळताना करंज्या तुपात विरघळतात). त्यावर दुसरी केशर वाली पोळी घालणे, परत सारणाची पेस्ट लावणे. त्यानंतर तिसरी साधी पोळी ठेवणे आणि परत पेस्ट लावणे. ३ थर झाले कि घटत दाबून त्याची गुंडाळी करणे आणि मग सुरीने तिरके छोटे छोटे काप करणे. साधारण एका गुंडाळी मध्ये, १२-१४ काप होतात. थोडी तिरपी गोळी बंद करून ती पुरीसारखी लाटणे. त्यामध्ये dryfruit चे चूण भरणे आणि कात्रणाने कडा कापणे. थोड्या मंद आचेवर, करंज्या तळणे. वरील साहित्यात साधारण ४० मध्यम आकाराच्या करंज्या होतात.