Sign In New user? Start here.

 
 
     
 

महेश कोठारे
‘झपाटलेला ’ दिग्दर्शक महेश कोठारे

सद्या मराठी इंडस्कृष्णधवल चित्रपटांच्या सुवर्णकाळानंतर मध्यंतरी ऐंशी - नव्वदच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीला मरगळ आली होती. चित्रपटांची संख्या वाढत होती परंतु त्यांच्या दर्जाबाबत मात्र परिस्थिती गंभीरच होती. अशा काळात मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी देण्याचं आणि तिकीटबारीवर गल्ला जमवुन हाऊसफुल्ल यश मिळवण्याची कामगिरी काही मोजक्या निर्माता -दिग्दर्शकांनी केली. त्यात एक महत्त्वाचं नाव आहे ‘महेश कोठारे’ यांचं. विनोद, थरार, गाणी, अभिनय, दर्जेदार तांत्रिक मुल्य, चांगली कथा-पटकथा अशा सर्वच बाबींचा समावेश असणारं एण्टटेन्मेंट पॅकेजच कोठारेंनी आपल्या चित्रपटात दिलं.

‘धुमधडाका’, ‘थरथराट’, ‘धडाकेबाज’, ‘दे दणा दण’, ‘माझा छकुला’, ‘झपाटलेला’, ‘खबरदार’, ‘पछाडलेला’ अशा एक ना अनेक चित्रपटांमधून कोठारेंनी वेगळेपणा जपत पत्येक चित्रपटांतून एक नव्या आणि अनोख्या कल्पनेची मेजवानी त्यांनी पेक्षकांना दिली. मग ती कल्पना धडाकेबाज मधील बाटलीतील गंगारामची असो, दे दणा दण मधील मारुतीची पॉवर मिळालेल्या लक्ष्याची असो किंवा बाहुल्यामध्ये स्वत:चे पाण टाकून थरकाप उडवणाऱया तात्या विंचूची असो. ही कल्पना आणि हा पत्येक पयोग महेश कोठारेंनी यशस्वी करुन दाखवला. यातही उल्लेख करावा लागेल तो झपाटलेला या चित्रपटाचा. नव्वदच्या दशकात आजच्या तुलनेत तांत्रिक करामतींची सुविधा नसताना आणि बजेटची कमतरता ही महत्त्वाची अडचण असतानाही त्यांनी झपाटलेला सारखा उत्तम थरारपट दिला. हा चित्रपट तिकीटबारीवर धो धो चालला. अगदी हिंदीमध्येही डब झाला. त्यातील तात्या विंचू, तो बाहुला आणि त्याचा ‘ओम् फट् स्वाहा’ हा डायलॉग लहानांपासून मोठयांपर्यंत पसिद्ध झाला. या सर्व गोष्टीमुळे झपाटलेला हा चित्रपट महेश कोठारेंसाठी कायम जवळचा राहिला. त्यामुळेच या चित्रपटाचा सिक्वल त्यांनी बनवला नसता तरच नवल वाटलं असतं. नुकताच महेश कोठारेंनी ‘झपाटलेला 2’ ची अधिकृत घोषणा करीत चित्रपटाच्या मुहूर्ताचा नारळ फोडला. विशेष म्हणजे हा सिक्वल संपूर्णपणे थ्रीडी तंत्राच्या साहयाने बनवून मराठीत परत एक नवा पायंडा पाडण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे.

एखाद्या निर्जिव बाहुल्यामध्ये माणसाचा पाण किंवा आत्मा जाणे आणि त्याने आपल्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी नायकाच्या मागे लागणे खरं तर ही ‘वन लायनर’ खूसप भन्नाट होती. कागदावर ही कल्पना चमकदार आणि हीट वाटत असली तरी पत्यक्षात उतरविणे हे मोठया मेहनतीचं आणि कसब पणाला लावणारं काम होतं. नव्वदच्या काळात संगणक हा शब्दही अनेकांना माहितीही नव्हता त्यामुळे Computerised Special Effects किंवा आजच्या सारखं Computerised Editing हे पकार त्या काळात अस्तित्वातही नव्हते. त्यामुळे बाहुल्याच्या करामती हे Mannualy Effects म्हणजे मानवी तंत्राच्या साहयाने दाखवणं आवश्यक होतं. त्यासाठी या क्षेत्रात तज्ञ असणाऱया व्यक्तिची निवड होणं खूप गरजेचं होतं. कारण बाहुल्याच्या हालचाली, हावभाव, संवाद हे सर्व खलनायकी वाटणं ही एक महत्त्वाची गरज होती. कारण ते तसं वाटले नाही तर हा पयोग फसण्याची आणि मेहनत वाया जाण्याची जास्त शक्यता होती. परंतु शब्दभ्ा्रमकार रामदास पाध्ये आणि त्यांच्या पत्नी अपर्णा पाध्ये यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली आणि पडदयावरचा तात्या विंचू सर्वांच्या मनात दहशत निर्माण करण्यात यशस्वी झाला. चित्रपटाच्या शेवटी इन्स्पेक्टर महेशच्या अचूक नेमाने मेलेला तात्या विंचू आता परत येतोय. परत तिच दहशत निर्माण करण्यासाठी आणि यावेळी तो आपल्याला दिसणार आहे थ्रीडी इफेक्ट मध्ये. अर्थातच ‘झपाटलेला 2’ या चित्रपटामधून.

....

‘झपाटलेला’ च्या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीमध्ये अनेक गोष्टी पहिल्यांदाच होत आहेत. जसं की हा मराठीतला पहिला सिक्वल चित्रपट असणार आहे. पूर्णपणे थ्रीडी इफेक्ट मध्ये चित्रीत होणारा आणि फॉक्स स्टार स्टुडीयोची हॉलीवुड निर्मिती संस्थेद्वारा वितरक आणि वितरण होणारा हा पहिलाच चित्रपट ठरणार आहे. अशा अनेक गोष्टी जुळून आल्यामुळे दिग्दर्शक महेश कोठारे आनंदी आणि उत्साहित आहेत. या उत्साहाच्या भरात ते ‘झपाटलेला 2’ विषयी भरभरुन बोलत होते. विषयाची सुरुवात झाली ती या सिक्वलसाठी एवढा कालावधी का घेतला? या प्ा्रश्नाने. यावर उत्तर देताना कोठारे म्हणाले की झपाटलेला हिट झाला आणि तेव्हापासूनच या चित्रपटाचा पुढचा भाग व्हावा अशी इच्छा मनात होती, परंतु ती कथा पुढे सरकण्यासाठी एक योग्य लिंक असणं गरजेचं होतं. कारण ती लिंक तार्पिक पातळीवर लोकांना पटणं मला जास्त आवश्यक वाटत होत. त्यामुळे ती कथा आणि पटकथा लिहिण्यासाठी वेळ लागला आणि आता माझं हे स्वप्न पुर्ण होत आहे हे सांगताना त्यांच्या चेहऱयावर असणाऱया आनंदला एक दु:खाची लकेरही होती आणि ते दु:ख होतं आपला जिवलग मित्र ‘लक्ष्या’ यांच्या हयातीत हा सिक्वेल बनला नाही याचं. ‘झपाटलेला’ चा हा सिक्वल जुन्या नव्या कलाकार आणि तंत्रज्ञाना घेऊन तयार होत आहे परंतु लक्ष्याची अनुपस्थिती कायम खटकत राहील ही मनातील भावनाही त्यांनी व्यक्त केली.

या चित्रपटाच्या निमित्ताने हॉलीवुडची ही कंपनी पथमच मराठी चित्रपटाच्या मार्केटींगसाठी पुढाकार घेत आहे. ही खरच खूप अभिमानास्पद बाब आहे. मराठी चित्रपट आंतरराष्टीय चित्रपट महोत्सवांमधून आपल्या किर्तीचे झेंडे साता समुदापार फडकवत आहे आणि या चित्रपटासाठी तर एवढी नावाजलेली कंपनी आपल्या क्षेत्रात पदापर्ण करत आहे हे खऱया अर्थाने आपला चित्रपट ग्लोबल झाल्याचं दयोतक आहे.

झपाटलेला 2 मध्ये आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर मुख्य भुमिकेत दिसणार आहेत तर त्यांच्या सोबतीला मकरंद अनासपुरे, विजय चव्हाण, विशाखा सुबेदार आणि अर्थातच तात्या विंचूचा तो बाहुला अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. झपाटलेला ची कथा ज्या गावात संपली होती तेथूनच पुढे ‘झपाटलेला 2’ सुरु होणार आहे. आदिनाथ यात लक्ष्याच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. सई ताम्हणकर पत्रकाराच्या तर सोनाली कुलकर्णी तमाशाच्या फडावरील लावण्यवतीची भूमिका करणार आहे. चित्रपटाची तांत्रिक टीम ही अतिशय अनुभवी अशीच आहे. चित्रपटाचं बहुतांश चित्रीकरण नितीन देसाई यांच्या कर्जतमधील एन.डी. स्टुडीओत होणार असून देसाई स्वत: पोडक्शन डिझायनरची जबाबदारी सांभाळत आहेत. चित्रपटाचं संगीत अवधूत गुप्ते यांचं असणार आहे तर छायाचित्रण सुरेश देशमाने करणार आहेत. हा चित्रपट पुर्णपणे थ्रीडी मध्ये शुट करण्यात येणार आहे. यासाठी थ्रीडी तंत्रज्ञानावर कमालीची हुकुमत असणारा स्पेनचा विख्यात तंत्रज्ञ एन्रिके कियाडो या चित्रपटाची तांत्रिक बाजू सांभाळणार असून एस एफ एक्स आणि थ्रीडी सहकार्य पाईम फोकसकडून मिळणार आहेत. सिलेक्ट मिडीया होल्डिंगस् पस्तुत आणि कोठारे ऍण्ड कोठारे व्हिजन निर्मित झपाटलेल्या 2 ची निर्मित वेगात सुरु आहे. स्वत: आदिनाथ कोठारे निर्मात्याच्या भूमिकेत आहे. एकदंरीतच नव्या जुन्याचा आणि देशी - परदेशी तंत्र आणि तंत्रज्ञाच्या साहयाने बनणारा झपाटलेला 2 हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.