Sign In New user? Start here.

नाइलाज

 
     
 

संगीता जोशी
 
नाइलाज

नाइलाज, मी स्वप्नाला ही खरे म्हणालो
दुरावलेल्या भिंतींना मी घरे म्हणालो...

छळणाऱया जीवनास मी ,काय रे , म्हणालो
तेहि म्हणे, तू मरायचे, मी बरे म्हणालो...

जखमा त्यांनी केल्या मजला येता जाता
एकदाच मी काट्यांना बोचरे म्हणालो...

पडलो,उठलो, उठुनी पडलो, पुन्हा पुन्हा मी
किती भाबडा होतो मी हात रे म्हणालो.....

वेलीवरचे फूल अचानक गळून गेले
दवबिंदू लपवून त्यास हास रे म्हणालो....

-संगीता जोशी