Sign In New user? Start here.

‘१० दिवस’ रंगणार इंग्रजी नाट्य महोत्सव

 
 

‘१० दिवस’ रंगणार इंग्रजी नाट्य महोत्सव

आज पर्यंत पुण्यामध्ये विविध नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले जात होते, पण या वेळी पहिलाच इंग्रजी नाट्य महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. हा महोत्सव १० दिवस होणार आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि ऑर्केस्ट्रेड क्यू वर्क्स यांच्या संयुक्त विद्यमांन आयोजित ‘पुकार’ या नाट्य महोत्सवाला आज (शुक्रवारी, ७ फेब्रुवारी) ला संध्याकाळी ६.३० वाजता सुरवात होणार आहे. अमोल पालेकर यांच्या हस्ते महोत्सवांच उदघाटन झाल्यानंतर संदीप राव यांचा ‘कॉमेडी इन द डार्क’ हा अ‍ॅक्ट रंगणार आहे. त्यानंतर ‘फायनल ड्राफ्ट हे नाटक होईल.

उद्या संध्याकाळी ४.३० वाजता सॅम्युअल बेकेट यांचं ‘क्रॅप्स कल्चरल लास्ट टेप’ हे नाटक होईल. संध्याकाळी यांच्यासह लाइव्ह म्युझिक कॉन्सर्ट रंगेल. रात्री आठ वाजता मुबंईच्या द आर्टिस्ट्स स्टुडिओतर्फे आयोजित क्रिस्टल अ‍ॅनिव्हर्सरी हा प्रयोग होईल. रविवारी संध्याकाळी ६.३० वाजता प्लॅटफॉर्म परफॉर्मन्सनंतर रात्री आठ वाजता सुजय सापळे दिग्दर्शित ‘अनसेल्फड’ हा प्रयोग होईल.

शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता लाइव्ह म्युझिक त्यानंतर कोलकाताच्या ग्रुपचा ‘धिस साइड ऑफ द टुथ’ ही सांगीतीक संध्या रंगणार आहे. रात्री आठ वाजता पुण्याच्या ऑर्केस्ट्रेटेड क्यू वर्क्सचं ‘किस अ‍ॅंड टेल’ चा प्रयोग होणार आहे. शनिवारी ओपन आर्ट जॅम’ व रात्री आठ वाजता ‘द रोड अहेड’ हा परिसंवाद होणार आहे. रविवारी (१६) इंडियन कार्टेल ग्रुपतर्फे ‘इटस नॉट व्हॉट यू थिंक’ हा प्रयोग होईल. संध्याकाळी ‘अनटोल्ड स्टोरी बाय भारती कापाडिया’ आणि रात्री ‘टिटस अ‍ॅड्रोनिकस’ नं महोत्सवाची सांगता होईल.