Sign In New user? Start here.
 
 

कितीही झाल्या गुदगुदल्या तरी आपल्यातच राहू द्या

शहरात पोटाचा प्रश्न लवकर सुटतो पण अंग टाकण्यासाठी जागा मिळ्णं खूप कठीण, अशातच भविष्याची अनेक स्वप्न रंगवत शहरात आलेले हरी हरपळे (सागर पवार), ऒम पाटॊळे(सुरजा कांबळे) हे दोन तरूण गुप्ते काका (सुदेश म्हशिलकर) च्या खोलीत राहतात. काही दिवसांनी राहात्या खोलीचं भाड थकल्यानंतर गुप्ते काका या भाडेकरूंना घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतात पण भाडेकरूही कट्टर..

ते काही घर सोडण्यास तयार नाहीत. हे लक्षात आल्यानंतर गुप्ते काका अनेक युक्त्या लढवतात. यातून घडतो एक वेगळाच प्रसंग. संशयाला जाग मिळते अन गुंतागुंत वाढत जाते.समर्थ प्रॉडक्शन नवचैतन्य कला प्रस्तुत वृध्देश्वर पाच पांडव निर्मित "आपल्यातच राहू द्या" या नाटकाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. शरणम पाड्मुख यांनी तर अनेक चित्रपट, नाटक, मालिकांमध्ये सक्षम अभिनयाने स्वत:ची ऒळख निर्माण केलेले सुदेश म्हशिलकर हे प्रमुख भूमिकेत असून बुलेट ट्रेन फेम देवयानी मोरे, सागर पवार, डॉ.रेश्मा बोरा, सुरज कांबळे, लक्ष्मण कांबळे, काकासाहेब शिरोळ, महेंद्र चव्हाण, उज्ज्वला गौड इतर कलाकार आहेत./p>

 

----------