Sign In New user? Start here.
 
 

फेसबुकर वरील #‎amarphotostudio‬ चे रहस्य उलगडले...!

#‎amarphotostudio‬ चॅलेंजच्या मागचे रहस्य उलगडल? तुम्ही म्हणत असाल की आम्ही नेमक्या कोणत्या रहस्याबद्दल बोलत आहोत तर. काही दिवसांपासून फेसबुकवर मराठी सेलिब्रिटी एकमेकांना एक खास चॅलेंज देताना दिसत आहेत. यामध्ये मराठी सेलिब्रिटींमध्ये पासपोर्ट फोटो फेसबुक अकाउंटवर शेअर करण्याचे चॅलेंज सुरु झाले आहे. पहिल्यांदा अभिनेता अमेय वाघने स्वतःचा पासपोर्ट फोटो पोस्ट करुन इतर मराठी सेलिब्रिटींना हे चॅलेंज द्यायला सुरुवात केली. #‎amarphotostudio‬ या हॅशटॅगने अमेयने स्वतःचा पासपोर्ट फोटो शेअर करुन अभिनेत्री स्पृहा जोशी, सिद्धार्थ मेनन, आणि प्रिया बापट यांना हे चॅलेंज दिले. या तिघांनीही हे चॅलेंज स्वीकारत त्यांचे पासपोर्ट फोटोज शेअर केले आणि त्यांच्या इतर सेलिब्रिटी मित्रांना हे चॅलेंज दिले.

आत्तापर्यंत अमेय वाघसह, श्रुती मराठे, प्रिया बापट, पूजा ठोंबरे, सिद्धार्थ मेनन, गायिका सावनी रविंद्र, सिद्धार्थ चांदेकर, सखी गोखले, निपूण धर्माधिकारी या सेलिब्रिटींनी त्यांचे पासपोर्ट फोटोज फेसबुक अकाउंटवर शेअर केले आहेत.

गंमत म्हणजे हे #‎amarphotostudio‬ नेमक काय आहे हे कळायला मार्ग नव्हता पण त्याचा उलगडा फेसबुवर करण्यात आला. अमर फोटॊ स्टुडीऒ हे नवीन नाटक असून हा एक नाटकाच्या प्रमोशनचा फंडा आहे. या नाटकामध्ये दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतील सुव्रत जोशी, अमेय वाघ , सखी गोखले आणि पूजा ठोंबरे आहेत याच बरोबर सिध्देश हा अभिनेता ही या नाटकामध्ये दिसणार आहे. हे नाटक मनस्विनी लता रविद्र या लेखिकेने लिहले आहे.दिल दोस्ती दुनियादारी मालिका ही याच लेखिकेने लिहली होती. याचबरोबर निपुण धर्माधिकारी यांनी या नाट्काचे दिग्दर्शन केले आहे.एकूणच काय वर्षापूर्वी ज्या टीमने टेलीव्हीजन वर धमाल केली होती आणि प्रेक्षकही त्यांना पाहून सुखावत होते अशी टीम रंगमंचावर काय धमाल करते हे लवकरच कळेल.

----------