Sign In New user? Start here.

‘एक साथ नमस्ते’ व्यावसायिक रंगभूमीवर

 
 

‘एक साथ नमस्ते’ व्यावसायिक रंगभूमीवर

   परळच्या महर्षी दयानंद अर्थात एम.डी महाविद्यालयाचे मराठी नाट्यचळवळीत एक महत्वाचे स्थान आहे. मराठी रंगभूमीसाठी एकाहून एक सरस कलावंत, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञांची फळी उभारणारे एम.डी एकांकिका स्पर्धांमधले दादा महाविद्यालय. वर्षभरात दणदणीत पारितोषिकांची रास उभी करणा-या एकांकिक हे एम.डीचे महत्वाचे वैशिष्ट्य. एम.डी च्या या नाट्य इतिहासात एक मानाचे पान म्हणजे हृषिकेश कोळी लिखित आणि प्रल्हाद कुडतरकर दिग्दर्शित एकांकिका हिस्टरी ऑफ लिजंड.

   २००६ सालच्या या एकांकिकेने महर्षी दयानंद महाविद्यालयातर्फ़े भवन्स कला केंद्र आयोजित कोपवुड तसेच मुन्शी शिल्ड जिंकली आणि नंतर एम.डी साठीच तब्बल ६५ पारितोषिकांवर आपले नाव कोरले. त्यानंतर गेल्या ७ वर्षात ह्या एकांकिकेने अवघ्या महाराष्ट्रभर तिच्या वेगळ्या विषयामुळे आणि उत्स्फुर्त सादरीकरणामुळे पुरूषोत्तम करंडक, पु.ल.देशपांडे करंडक यासारख्या शभंरहून अधिक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जिंकुन आपलं वर्चस्व सिद्ध केलं. अशी ही एकांकिका हिस्टरी ऑफ लिजंड व्यावसायिक रंगभूमीवर किरण लाळगे, गणेश गावकर आणि संदीप विचारे या तीन तरून निर्मात्यांच्या उर्जिवा थिएटर या बॅनरखाली ‘एक साथ नमस्ते’ या नावाने दाखल होत आहे.

   मुळातंच विषयातं वेगळेपण आणि अभिव्यक्ती होण्याचं धाडस बाळगुन केलेला हा प्रयोग मराठी रंगभूमीवर अतिशय कुतुहलाचा भाग बनुन राहिला आहे. कारण, जर भारतीय इतिहास नव्याने लिहण्याची वेळ आली तर काय होऊ शकेल हा एक वेगळाच दृष्टीकोन ‘एक साथ नमस्ते’ मांडते आणी प्रेक्षकांना अंतर्मुख करायला लावते. जश्या मुलांच्या इयत्त बदलत जातात तसा त्यांच्या समोर येणारा इतिहास बदलत जातो. मुलांचे अवांतर वाचन वाढले कि त्यांच्या समोर येणाअरा इतिहास वेगळा असतो. कालांतराने इतिहासाचे अनेक बदलेले पैलू मुलांसमोर येतात आणि खरा इतिहास कोणता असा नवा प्रश्न निर्माण होतो. इतिहासात असलेल्या काही घटना आपल्याला का सांगितल्या जात नाहीत किंवा इतिहासातल्या घटनांची न लागणारी संगती नव्या पिढीपुढे अनेक प्रश्न निर्माण करतात. या गोंधळलेल्या मनोव्यस्थेचा फायदा घेत अनेक राजकीय पक्ष आपली पोळी भाजूण घेतात. ऑप्शनल असलेला इतिहासासरखा विषय समाज किती घडवतो आणि बिघडवतो हे नेमकेपणाने ‘एक साथ नमस्ते’ मध्ये मांडण्यात आले आहे.

  चंद्रलेखाने सादर केलेले एक तिकीट सिनेमाचे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवर आधारित गिरगाव व्हाया दादर या दोन गाजलेल्या नाटकानंतर हृषिकेश कोळीचे हे तिसरे व्यावसायिक नाटक. लक्ष्य, आभास हा, रूणु झुणू या मालिकांचा संवाद लेखक आणि पटकथाकार प्रल्हाद कुडतरकर हा खरेतर महाविद्यालयीन रंगभूमीवरचा सर्वात यशस्वी य्रयोगशील दिग्दर्शक, तो यानिमित्ताने व्यावसायिक रंगभूमीवर येत आहे.

  मुळात अशा पद्धतीच्या धाडसी नाटकाला रंगभूमीवर आणण्यासाठी तेच धाडसी निर्मातेही लागतात. किरण लाळगे, गणेश गावकर आणि संदीप विचारे या तीन तरूण निर्मात्यांनी उर्जिवा थिएटर या बॅनरखाली या नाटकाची निर्मिती केली आहे. नुकताच या नाटकाचा मुहूर्त दादरच्या सावरकर स्मारकात मराठी रंगभूमीवरील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. विमल म्हात्रे, आरती सोळंकी, प्रणव रावराणे, संदीप रेडकर, मधुरा दिवेकर, अजय कांबळे, अभिषेक गावकर, गौरव मालणकर, भाग्यश्री पाणे, प्रमोद कदम, महेश वरवडेकर अभिनित हे नाटक ऑगस्ट महिन्यात रंगभूमीवर येणार आहे.