Sign In New user? Start here.

प्रत्येकाची वेळ यावी लागते, असं म्हणतात याचा अनुभव `अंशुमन विचारे' सध्या घेतोय...

'Ek tanha chand' musical play

 
 

मीना कुमारींच्या जीवनावर म्युझीकल नाटक ‘एक तनहा चॉंद’

   महजबीन बानो उर्प मीना कुमारी हिचा जन्म 1 ऑगस्ट 1932 रोजी मुंबईत झाला. तर मृत्यू 31 मार्च 1972 रोजी वयाच्या फक्त 40 व्या वर्षी झाला. ‘द टेजडी क्वीन’ हे बिरुद लाभलेल्या मीना कुमारीने 1939 ते 1972 या 33 वर्षाच्या कारकिर्दीत 93 चित्रपटात अभिनय केला असला तरी ‘साहिब बिबी और गुलाम’मधील तिची ‘छोटी बहू’ही भूमिका अक्षरश: ती जगली आहे. मीना कुमारी यांना आपल्या कारकिर्दीत ‘परिणीता’1953,‘बैजू बावारा’ 1954,‘साहिब बिबी और गुलाम’ 1963,‘काजल’ 1964, या चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. तर अशा रुपसंपन्न व अभिनयसम्राज्ञी अभिनेत्रीच्या जीवनावर ‘स्काय व्होक्स थिएटर ग्रुप’एक हिंदी नाटक रंगमंचावर घेऊन येत आहे ते म्हणजे ‘एक तनहा चॉंद’.

Ek tanha chand musical play

   ‘एक तनहा चॉंद’ या नाटकात मीना कुमारीची भूमिकेत रुबी एस साई ने आहेत,कुरेशी (अम्मान मियाँ),आनंद पभू (रौफ लाला) तर कमाल अमरोही आणि रेहमान या भूमिकेत अनुकमे इरफान सिददीकी व बंकार अली दिसणार आहेत. या नाटकाचे लेखन,संकल्पना,दिग्दर्शन,निर्मिती,अभिनेत्री अशी सगळयाच बाजू एकहाती पेलवल्यात ते रुबी एस साई ने यांनी. या नाटकाचे सहसय्यक दिग्दर्शक आहेत सागर गुज्जर, तर कला दिग्दर्शक आहेत गुरपीत कौर. यातील देखना सेट उभारलाय अंकूश कांबळी आणि संगीत दिलंय संदीप डांगे यांनी.

   ‘स्काय व्होक्स थिएटर ग्रुप’ पस्तुत मीना कुमारीच्या जीवनावरील ‘एक तनहा चॉंद’ या नाटकाचा पुढील पयोग हा 29 मार्च रोजी रविंदग नाटय मंदीर, पभादेवी येथे होणार आहे.