Sign In New user? Start here.

कोल्हापूरच्या प्रतिज्ञा नाट्यरंगच्या तरूणांचा नवा विक्रम

 
 

कोल्हापूरच्या प्रतिज्ञा नाट्यरंगच्या तरूणांचा नवा विक्रम

new
ekach pyala marathi natak Add Comment

कोल्हापूरच्या प्रतिज्ञा नाट्यरंगाच्या युवा कलाकारांनी सलग बेचाळीस तास एकच प्याला हे नाटक रंगमंचावर सादर करून नविन विक्रम केला आहे. या प्रयोगासाठी या तरूणांनि सलग तीन महिने प्रॅक्टीस केली. हा देवल क्‍लबमध्ये हा प्रयोग करण्यात आला आणि महत्वाच म्हणजे प्रयोग पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना ऐच्छिक प्रवेश शुल्क होते.

त्यामुळे प्रयोग पाहून बाहेर पडताना प्रेक्षक काही रक्कम क्लबच्या बाहेर ठेवलेल्या पेटीत टाकत होते. या निधीतून पतीच्या व्यसनामुळे हतबल झालेल्या किंवा आर्थिक दुर्बल कुटुंबातील महिलांना स्वयंरोजगारासाठी मदतही दिली जाणार आहे. नाटकाचे सलग चौदा प्रयोग करून या युवा कलाकांरानी राम गणेश गडकरी यांना अनोखी आदरांजली वाहिली.

प्रशांत जोशी यांचे दिग्दर्शन होते, तर नाटकात अनिल राबाडे, शर्वरी जोग, जितेंद्र पोळ, महेश भूतकर, जयश्री देसाई, नरेंद्र देसाई, गोपी वर्णे, राजेंद्र चौगले, सूरज गुरव, शंकर नायडू, अजित पाटील, समीर दांडेकर, विकास काळे आदींच्या भूमिका होत्या. अविनाश काटे, संजय जोग, दिग्विजय कालेकर यांचे तांत्रिक साह्य होते. डॉ. राजीव नागावकर यांनी योगाचे, तर डॉ. शिवराज देसाई यांनी आहारविषयक मार्गदर्शन केले.
----------