Sign In New user? Start here.

‘नक्षत्र मध्ये मराठी रंगभूमीवरील एक एव्हरग्रीन कौटुंबिक नाटक,' घर श्रीमंतांच'.

 
 

‘नक्षत्र मध्ये मराठी रंगभूमीवरील एक एव्हरग्रीन कौटुंबिक नाटक,' घर श्रीमंतांच'.

new
GHAR SHRIMANTACHa" PLAY on Zee MarathiAdd Comment

झी मराठी वरील नक्षत्र मध्ये मराठी रंगभूमीवरील एक एव्हरग्रीन कौटुंबिक नाटक,' घर श्रीमंतांच'.हेमंत ऎदलाबादकर लिखित आणि सुधीर जोशी दिग्दर्शित या नाटकात सुधीर जोशी ,आशा काळे, अतुल परचुरे, निलम शिर्के,शेखर फडके यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

कथासार : कुलकर्णी आडनावाच एक मध्यमवर्गीय कुटुंब. आई ( आशा काळे ),वडील ( सुधीर जोशी ),मुलगी ( निलम शिर्के ),मुलगा ( शेखर फडके ),जावई ( अतुल परचुरे ) या आनंदी कुटुंबाचे शिलेदार.संस्कारांच्या छताखाली हसतखेळत नांदणाऱ्या या कुटुंबात एक आगळी घटना घडते. देव्हा ऱ्यात पिढ्यान पिढ्या पुजल्या जाणाऱ्या शाळीग्रामांपैकी एकाला तडा जातो आणि त्यात मौल्यवान रत्न सापडतात ,चांगली किंमत येते.य़ातच नव्या व्यवहारी पिढीची नजर जाते ती उरलेल्या शाळीग्रामांवर ,पण या शाळीग्रामांवरची आईची श्रद्धा मात्र ढळत नाही . पिढ्यान पिढ्या जपलेल्या या श्रद्धेचा व्यवहार आईला पसंत नाही

आता या संघर्षात ,श्रद्धा जिंकते कि पैसा ? पहायला विसरू नका मराठी रंगभूमीवरील एक सदाबहार कौटुंबिक नाटक, ' घर श्रीमंतांच'.' घर श्रीमंतांच' हे नाटक रविवार ८ जून रोजी दुपारी १.०० वाजता ‘झी मराठी’वरील ‘नक्षत्र’ कार्यक्रमात प्रक्षेपित होणार आहे.
----------