Sign In New user? Start here.
 
 

‘हसवाफसवी’ चा ७५ वा प्रयोग

new
Hasava fasvi Natakacha 75th showAdd Comment

जिगीषा’ आणि अष्टविनायक’ या न नाट्यसंस्थेची निर्मिती असलेलं ‘हसवाफसवी’ हे दिलीप प्रभावळकर लिखीत आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नाटक सध्या रंगभूमीवर सुरू असून या नाटकात पुष्कर श्रोत्री या अष्टपैलू अभिनेत्यानं सहा वेगवेगळ्या भूमिकांच शिवधनुष्य़ लिलया पेललं आहे. येत्या रविवार, ८ जून रोजी दुपारी ४ वा. यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे या नाटकाच ७५ वा प्रयोग सादर होत आहे. या नाटकात पुष्कर श्रोत्री सोबत सतीश जोशी, वैखरी पाठक, संकेत सुभेदार यांच्याही भूमिका आहेत.

मुंबई, पुण्यापासून विदर्भ, मराठवाड्यासह पार साता समुद्रापलिकडे दुबई पर्यंत ‘हसावाफसवी’ चे प्रयोग झाले असून पुढील महिन्यात अहमदाबाद, बडोदा आणि गोवा येथेही ‘हसवाफसवी’ ला निमंत्रण आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात हे नाटक यशस्वी झाले असून ‘कृष्णरावां’ च्या भूमिकेला पुष्कर रसिकांच्या ‘वन्स मोअर’ घेतो.

या नाटकाचे निर्माते दिलीप जाधव आणि श्रीपाट पद्माकर असून प्रदीप मुळये यांनी अतिशय साधं आणि कल्पक नेपथ्य उभं केलं आहे. अजित परब यांच पार्श्वसंगीत, प्रतिमा जोशी-भाग्यश्री यांची वेशभूषा यांचीही या नाटकाला मोलाची साथ मिळाली आहे.
----------