Sign In New user? Start here.
 
 

तरुणांना आवडेल असे धम्माल विनोदी नाटक “हीच तर प्रेमाची गम्मत आहे”

new
hich tar premachi gamat' old marathi drama in new formAdd Comment

तरुणांना आवडेल असे धम्माल विनोदी “हीच तर प्रेमाची गम्मत आहे” हे पूर्नजीवित नाटक निर्माते वैभव माने घेऊन येत असून हया नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रविवार २७ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता शिवाजी मंदिर नाट्यगृहात होत आहे.अशोक पाटोळे लिखित हया नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले असून नेपथ्य राजन भिसे व संगीत अशोक पत्की यांचे आहे.

काही वर्षापूर्वी “हीच तर प्रेमाची गम्मत आहे” हया नाटकाने रसिकांची मने जिंकून प्रचंड यश मिळवलं होतं. त्यावेळी हया नाटकातून संजय मोने, शुभांगी गोखले, मैथिली वारंग, मंगेश कदम आणि सुनील बर्वे ह्यांनी आपल्या अप्रतिम सक्षम अभिनयाने प्रेक्षकांना तुफान हसवले होते. हेच नाटक आता नव्या बॅनरखाली येत असून आता त्यांच्या जागी संतोष मयेकर, आदिती देशपांडे, सुखदा खांडकेकर, रोहित हळदीकर आणि डॉ. अमोल कोल्हे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. “शंभूराजे”, “भगवा” हयासारख्या ऐतिहासिक नाटकातून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे डॉ. अमोल कोल्हे हया नाटकाद्वारे रोमॅंटिक भूमिकेत दिसणार आहेत.

आपण आपल्याला अनुरूप आणि आपल्यावर जीव लावणार्‍या जोडीदाराच्या शोधात सतत असतो. पण हा शोध घेताना बरेचदा आपल्यावर खरी माया करणार्‍या लोकांकडे आपण दुर्लक्ष करतो. हया विरोधाभासाची खट्याळ नोंद घेणारं नाटक म्हणजे “हीच तर प्रेमाची गम्मत आहे”. या नाटकातील नायक डॉ. राहुल एक बिनधास्त, गुलछबू वृत्तीचा आहे. त्याचं लग्नाचं वय उलटून गेलं तरी तो वधूच्या शोधात आहे. त्याला मनासारखी म्हणजेच त्याच्यावर खरं प्रेम करणारी मुलगी हवी आहे. तो माणिक नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो व तीला पटवण्यासाठी नाना युक्त्या करतो. पण तो त्यात यशस्वी होतो का ? त्याला खरं प्रेम लाभतं का ? हया अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला हया नाटकात पहायला मिळतील.

 

----------