Sign In New user? Start here.

‘स्व’चा शोध घेणारे ‘जन्मरहस्य’ !

 
 

‘स्व’चा शोध घेणारे ‘जन्मरहस्य’ !

   शरद बागवे यांच्या श्री समर्थ प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेले कुमार सोहोनी दिग्दर्शित ‘जन्मरहस्य’ हे नाटक असून येत्या १६ नोव्हेंबर रोजी या नाटकाचा शुभारंभ होत आहे. प्रख्यात मानसोपचार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी लिहिलेले हे नाटक असल्याने या नाटकाचा विषयही चाकोरीपलीकडचा आहे. विशेष म्हणजे ‘तुझ्याविना’ या नाटकाच्या नंतर तब्बल सात वर्षांनी डॉ. आनंद नाडकर्णी आणि कुमार सोहोनी ही जोडी जन्मरहस्य निमित्ताने परत एकत्र आली आहे.

   ‘अग्निपंख’, ‘रातराणी’ ‘देहभान’, ‘सुखाशी भांडतो आम्ही’, ‘तुझ्याविना’, ‘मी रेवती देशपांडे’ अशा नाटकांमधून असंख्य वेगळे विषय यशस्वीपणे हाताळत आपल्या दिग्दर्शनाचा ठसा उमटवलेले कुमार सोहोनी यांनीच या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी दिग्दर्शनाच्याच बरोबरीने प्रकाश योजनेचीही जबाबदारी या नाटकासाठी पार पाडली आहे.

   अवघ्या काही दिवसांपूर्वीच लता मंगेशकर पुरस्काराचे मानकरी ठरलेले ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी ‘जन्मरहस्य’ या नाटकाला संगीत दिले आहे. संजीव चिमलगी आणि कल्याणी साळुंखे यांनी पार्श्वगायन केले आहे. या नाट्काचे नेपथ्य अजय पुजारे ह्यांचे असून वेशभूषा प्रकाश निमकर यांनी केले आहे. तर नाटकाच्या सूत्रधारपदी दिंगबर प्रभू विराजमान आहेत.

   माणसाच्या जन्माबरोबर त्याला मिळत असतो त्याचा स्वत:चा असा वारसा. हा वारसा जशी जनुके देतात तसेच संस्कारही देतात. ह्या वारश्याबद्दलचं प्रत्येक व्यक्तीचं एक ठाम मत असतं. ह्या मताला आव्हान देणारी परिस्थीती निर्माण होते तेव्हा ती व्यक्ती मुळापासून हादरते. अशा परिस्थीतीचा सामना करून स्वत:चा तोल परत मिळविण्यासाठी कराव्या लागलेल्य संघर्षाची कहाणी म्हणजे हे नाटक.

   शरद बागवे यांना चित्रपटनिर्मितीचा फार मोठा अनुभव आहे, यशिवाय नाटकांशीही त्यांचा जवळचा संबंध आहे. अशा शरद बागवे यांच्या श्री समर्थ प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या या नाटकात इला भाटे, अमिता खोपकर, वसुधा देशपांडे, राहुल कुलकर्णी, गुरूराज अवधानी आदी कलाकार आहेत.