Sign In New user? Start here.

"जस्ट हलकं फुलकं" नाटकाचा २००वा प्रयोग

 
 

"जस्ट हलकं फुलकं" नाटकाचा २००वा प्रयोग

धमाल विनोदी ‘जस्ट हलकं फुलकं’ ह्या नाटकाचे नुकतेच २०० प्रयोग पूर्ण केले आहेत. या नाटकाचे २०० भाग पूर्ण झाल्या निमित्त अनेक मराठी कलाकारांनी नाटकाच्या प्रयोगाला आवर्जून हजेरी लावली. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील प्रसिध्द जोडी सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे यांच्यसोबत अभिनेत्री अनिता दाते या नाटकात मुख्य भूमिकेत आहेत. या नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलाच त्याचबरोबर अनेक कलाकारांनीही त्याला पसंती दिली. या २०० व्या प्रयोगानंतर उमेश कामत, प्रसाद ओक, श्रेया बुगडे, कविता लाड, सतिश राजवाडे, विद्याधर जोशी, राजन भिसे, अनिकेत विश्वासराव, मंगेश बोरगांवकर या कलाकारांच्या उपस्थितीत केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले.

हे नाटक पंधरा वर्षापूर्वी रंगभूमीवर आलं होतं. तेव्हा रसिका जोशी, विजय कदम, आणि नंदू गाडगीळ या तीन कलाकरांनी या भूमिका केल्या होत्या. हलकं फुलकं नाटक हे ऋषिकेश परांजपेंनी लिहीलेल आहे. आता याच नाटकात थोडे बद्ल दिग्दर्शक गणेश पंडित ह्यांनी सादर केलं आहे.

----------