Sign In New user? Start here.

“लगीनघाई” ७५ वा अमृत महोत्सवी प्रयोग

 
 

“लगीनघाई” ७५ वा अमृत महोत्सवी प्रयोग

“सुयोग” म्हणजे दर्जेदार कलाकृती. हे सुयोगच्या आजवरच्या अनेक यशस्वी नाट्य कलाकृतींनी सिद्ध करून दाखवले आहे. ‘सुयोग’ ह्यांची आजवरची नाट्य निर्मितीची परंपरा पहाता प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी नवीन खुमासदार व मनोरंजक पहायला मिळते. सध्या सुयोग चे “लगीनघाई” हे नाटक जोरात चालू असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. ज्येष्ट अभिनेते अशोक सराफ, आदिती देशपांडे, ओंकार राऊत आणि नियती घाटे अभिनीत व अद्वैत दादरकर लिखित आणि दिग्दर्शित “लगीनघाई” हया नाटकाने अल्पावधीतच ७५ व्या प्रयोगाचा टप्पा गाठलाय. आणि हे सर्व प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळेच सिद्ध झालंय.

सुयोगच्या “लगीनघाई” हया नाटकाचा ७५ वा अमृत महोत्सवी प्रयोग शनिवारी दि. ८ ऑगस्ट, २०१५ रोजी रात्री ८ वाजता दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे संपन्न होत आहे. हयावेळी नाट्य व चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. हया नाटकाला प्रेक्षकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल निर्माते गोपाळ अलगेरी यांनी हा प्रयोग प्रेक्षकांसाठी खास सवलतीच्या दरात ठेवला आहे. तसेच अमृत महोत्सवी धमाका म्हणून दि. १० ऑगस्ट, २०१५ पासून फक्त “लगीनघाई” हया नाटकाचे suyognatak.in वर ऑनलाइन तिकीट बुकिंग केल्यास प्रेक्षकांना रु. ३००/- चे तिकीट सवलतीच्या दरात म्हणजे रु. २५०/- मध्ये उपलब्ध होणार आहेत. ही योजना १५ ऑक्टोबर, २०१५ पर्यंत चालू राहील.

----------