Sign In New user? Start here.

"शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला" या नाटकाला तेलगु अभिनेत्री तारा अलीशा बेरीची विशेष उपस्थिती

 
 

"शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला" या नाटकाला तेलगु अभिनेत्री तारा अलीशा बेरीची विशेष उपस्थिती

सारा एंटरटेन्मेंट निर्मित, विद्रोही जलसाच्या सहकार्याने रंगमळा सादर करीत असलेल्या नंदू माधव दिग्दर्शित आणि भगवान मेदनकर यांची निर्मिती असलेल्या "शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला" या नाटकाचे तब्बल ३५०हून अधिक प्रयोग रंगभूमीवर गाजले असून अनेक पुरस्कारांवर ही या नाटकाने आपली मोहोर उमटवली आहे. नुकताच दिनांक २९जून रोजी शिवाजी नाट्यमंदिर येथे अनेक दिवसानंतर या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता.

आजवर अनेक तेलगु तसेच हिंदी सिनेमांमध्ये झळकणाऱ्या अभिनेत्री तारा अलीशा बेरी, वेशभूषाकार चांदनी साहू आणि दिग्दर्शक अभिक भानू यांची या नाटकाला विशेष उपस्थिती लाभली होती.लोकशाहीर संभाजी भगत यांच्या हस्ते या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.या नाटकाचा विषय मनाला भिडणारा असा असून कलाकारांचा अभिनयही उत्तम असल्याचे मत याप्रसंगी अभिनेत्री तारा अलीशा बेरी यांनी व्यक्त केले.

"शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला" या नाटकाबद्दल एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, हे नाटक खरा शिवाजी हा कुठल्या एका जातीचा,धर्माचा, समाजाचा किवा प्रांताचा नसून ते कष्टकर्त्याचा, पिडितांचा आणि शोषितांचा व यासोबतच माणूस म्हणून माणसाप्रमाणे जगणाऱ्याचा होता. आजही जे ही माणुसकी टिकवण्यसाठी जातीधर्माच्या पलिकडे जाऊन माणुसकीसाठी लढत आहेत त्यांचात तो जिवंत आहेत, राजे कुठलेही दैवी अवतार नसून ते एक माणूस होते ही खूप महत्वाची बाब डोळ्यासमोर आणण्याचे काम हे नाटक करते.आजच्या समाज व्यवस्थेसमोर जातीयतेची जी भिंत उभी आहे ते पाडण्याची ही एक अप्रतिम चळवळ म्हणजे हे नाटक आहे.

----------