Sign In New user? Start here.
 
 

बहरली रंगभूमी बाई माणसांनी...!

पूर्वी नाटकात काम करण्यासाठी स्त्री कलाकार मिळत नसे म्हणून पुरूष कलाकार स्त्री पात्र रंगवत असत. पण आज कल रंगभूमी वर पुरूष कलाकारांचे स्त्रीपात्र असणारे नाटक गाजत आहेत. सध्या रंगभूमीवर भरत जाधवची मोरुची मावशी, प्रसाद ओक ची नांदी, पुष्कर श्रोत्री- हसवा फसवी, वासुची सासू- प्रणव रावराणे आणि संतोष पवारच राधा ही कावरी बावरी जोरात सुरू आहे. स्त्रीपात्र रंगवणारे पुरुष कलाकारांची नाटकं सध्या प्रेक्षकांची पंसतीस उतरत आहेत. त्यामुळे रंगभूमी बाई माणसांनी बहरल्याच चित्र आहे.

प्रसाद ओक - नांदी या नाटकात प्रसाद ओक ला स्त्रीपात्रात पाहिल्यावर त्याला ओळखण हि मुश्किल होत दुसरी कोणतरी महिलाच रंगभूमीवर आली आहे असा भास होतो. दिलीप जाधव, प्रसाद कांबळी, चंदू लोकरे आणि संज्योत वैद्य या चार निर्मात्यांनी एकत्र येऊन हे 'नांदी' नाटक रंगभूमीवर आणलं आहे. शरद पोंक्षे, अविनाश नारकर, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, हृषिकेश जोशी, अश्विनी एकबोटे, सीमा देशमुख, तेजस्विनी पंडित आणि स्पृहा जोशी असे दहा कलाकार काम करत आहेत. या दहा कलाकारांनी नाटकांत एकूण 23 भूमिका पार पाडल्या आहेत.

प्रणव रावराणे - प्रदीप दळवी लिखित ‘वासूची सासू’ हे धमाल नाटक आहे. दिग्दर्शक मंगेश कदम यांनी काळानुरूप त्यात बदल केले आहेत. यामध्ये प्रणव रावराणे या कलाकार उभ करण म्हणजे मोठ अव्हानच वाटत. प्रणव ची अंगयष्टी पाहता ‘वासूची सासू’ मध्ये तो कसा दिसेल याबद्दल सुरवातील जोखमीच वाटत होत पण आत प्रणवचा अभिनय पाहता त्याने हे शिवधनुष्य खुप चांगल्या प्रकारे पेललेल दिसत. बारीक दिसणारे अण्णा आणि गोड वाटणारी सासू एकदा तरी पहावी.

पुष्कर श्रोत्री - दिलीप प्रभावळकर यांच्या 'हसवाफसवी' नाटक अजुन ही लोकांच्या चांगलच लक्षात आहे .आता या भूमिका पुष्कर श्रोत्री करत आहे. यामध्ये दिप्ती हे स्त्री पात्र पुष्कर ने खुप चांगल्या प्रकारे वठवल आहे. अशा भूमिका करताना विनोद अश्लिलतेकडे झुकण्याची खूप शक्यता असते. पण या नाटकांतले विनोद अशा प्रकारचे आहेत, की सर्व वयोगटातील प्रेक्षक हे पाहू शकतात.

भरत जाधव सुयोग प्रकाशित रसिकांजन निर्मित मंगेश कदम दिग्दर्शित 'मोरूची मावशी' पुन्हा बालगंधर्वच्या रंगमंचावर अवतरल. विजय चव्हाण म्हणजे मोरूची मावशी, सतीश तारे यांनी सुद्धा ती स्त्री भूमिका अजरामर केलेली होती, पण हे शिवधनुष्य भरतने सहजतेने पेलल. त्याला मुळात स्त्री वेशात पाहण आणि रंगमंचावरील स्त्री वेशातील वावर बायकांना सुद्धा लाजणारा होता. भरतची मावशी मुद्दाम जाऊन पहावी अशीच आहे. हसायच असेल आणि दुसऱ्याला सुद्धा हसवायच असेल तर हे नाटक जाऊन एकदा तरी पहावच.