Sign In New user? Start here.
 
 

"मदर्स डे" रंगभूमीवर

mothers day special drama
jyoti-savitri new marathi dramaAdd Comment

होणार सून मी या घरची’ या टीव्ही मालिकेत आईचा रोल करणारे सुप्रिया पाठारे, सुहिता थत्ते, स्मिता सरवदे आणि पूर्णिमा तळवलकर यांच ‘मदर्स डे’ हे नाटक येत्या १९ तारखेला रंगभूमीवर आल. लेखक दिग्दर्शक आनंद मसवेकरांचे यांनी केल आहे. या नाट्काचा विषय अतिशय गंभीर असून ब्लॅक कॉमेडीच्या अंगाने मांडला आहे. हि एक दोन वर्ष कोमात असलेल्या आईची गोष्ट असून एके दिवशी डॉक्टर सांगतात की आता काही तासात आई जाणार आहे आईची सेवा करणारी वाहिनी तसा निरोप तिघींना कळवते तश्या त्या धावतच येतात मात्र डॉक्टरांचा अंदाज चुकतो आणि आई आणखी जगणार आहे हे जेव्हा त्या मुलींना कळते तेव्हा त्या अस्वस्थ होतात आणि पुढे हा गंभीर विषय ब्लॅक कॉमेडीच्या अंगाने सरकतो.

हल्ली माणसांच्या भावना किती बोथट होत चालल्या आहेत याचं या नाटकात दर्शन होतं. भावनांचा आदर करणारी मागची पिढी संपत चालली असून व्यवहाराच्या पातळीवर जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचं मोजमाप करणाऱ्या नवीन पिढीचा उदय झाला असून तरुण पिढीला आई वडलांच्या प्रॉपर्टीवरचा हक्क हवा आहे पण कोणत्याही प्रकारच्या जबाबदाऱ्या मात्र नको आहेत. आजची मुलं व्यवहाराच्या अतिरेक करत कोणत्या थराला जाऊ शकतात याचं विदारक दर्शन या नाटकात घडते. अर्थात हे सगळं नाटक उपहास आणि ब्लॅक कॉमेडीच्या फॉर्म मधे असल्यामुळे प्रेक्षकांना हसवता हसवता अस्वस्थ करतं.

गोविंद चव्हाण प्रेझेंट्स, प्रदीप पाटील यांचे नेपथ्य आणि शीतल तळपदे यांची प्रकाश योजना असून पार्श्वसंगीत सतीशचंद्र मोरे याचं आहे. गोट्या सावंत सूत्रधार असून सुप्रिया पाठारे, सुहिता थत्ते, स्मिता सरवदे व पूर्णिमा तळवलकर यांच्या भूमिका आहेत. /p>

 

----------